BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मातीचं सोनं करण्याची धमक असणारे नेतृत्व - आमदार मानसिंगराव नाईक=दिनकरराव पाटील(गुरुजी)

-------------------------------------------------------

ब्रेकिंग न्यूज

शिराळा तालुक्यातील कोकरूड २,ढाणकेवाडी १, शिराळे खुर्द ९, निगडी १आशा तालुक्यातील १३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

पुनवत येथील ८५ वर्षीय महिला कोरोना मुक्त झाली आहे.

----------------------------------------------------------------------------------------


शिराळा विधानसभा मतदार संघाचा कायापालट करणारे व हातात माती घेतली तरी त्याचे सोनं करण्याची धमक असणारे नेतृत्व म्हणजेच आमदार मानसिंगराव नाईक. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा हा आढावा--------


गेले  ३० वर्षा पासून मी विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचा संचालक म्हणून काम करत आहे. माझ्या संचालकपदाची सुरुवात लोकनेते फत्तेसिंगराव नाईक (आप्पा) यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. त्यावेळेपासून मी आमदार मानसिंगराव नाईक यांना जवळून पाहत आहे.  आमच्या संचालक मंडळाची बैठक सुरू असताना आप्पांच्या समवेत ते बैठकीस आवर्जून उपस्थित असत. त्या बैठकीत होणारे निर्णय, कारखान्याचे व्यवस्थापन,संघटन कौशल्य असे अनेक बारकावे त्यांनी लहानपणीच आपल्या मनावर बिंबवले होते. त्याचा फायदा त्यांना २००० साली झाला.
             आप्पा आजारी पडल्याने कुटुंबाची जबाबदारी भाऊंच्यावरती आली. आप्पांनी सन २००० मध्ये कारखान्याच्या निवडणुकीची संपुर्णधुरा भाऊंच्यावरती सोपवली . त्यावेळी आपली कार्यक्षमता दाखवण्याची संधी त्यांना मिळाली . त्यांनी कारखान्याची निवडणूक बिनविरोध करून सहकारात एक वेगळा पायंडा पाडला .१० फेब्रुवारी २००० रोजी त्यांची कारखान्याच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली. हा बिनविरोधचा पायंडा सन २०१७ ची निवडणूक सलग चौथ्यांदा बिनविरोध करून पुन्हा सिद्ध करून दाखवला आहे . त्यावेळेपासून आज पर्यंत कारखान्याच्या नावलौकिकात दिवसेंदिवस भर पडत आहे .

              कारखान्याने अनेक राज्य व देश पातळीवरील पुरस्कार प्राप्त केले आहेत . कारखान्यास आय.एस.ओ.मानांकन मिळाले आहे . चांगल्या चालणाऱ्या कारखान्याच्या यादीत विश्वास कारखान्याचा समावेश आहे . कारखान्याची क्षमतेमध्ये वाढ केली असून विविध उपपदार्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना इतर मोठ्या कारखान्यांच्या तुलनेत दर देण्याचे सातत्य कायम ठेवले आहे.विराज व विश्वास उद्योग समुहाच्या माध्यमातुन विधानसभा मतदार संधातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले आहे . त्यांना भेटायला येणाऱ्यां प्रत्येकाचे आदरातिथ्य करण्याची नाईक घराण्याची परंपरा भाऊंनी आज ही कायम जोपासली आहे.

या मतदारसंघात गतवर्षी महापूर व आता कोरोनाचे संकट आहे. आशा बिकट परिस्थिती ते घरी न थांबता लोकांना धीर देण्यासाठी सतत  त्यांच्या संपर्कात आहेत. फतेसिंगराव नाईक इंडोमेन्ट ट्रस्टच्या माध्यमातून गत वर्षीपुराच्या वेळी नुकसान झालेल्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप व आत्ता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे, क्वारंटाईन लोकांसाठी बेडशीट,मणदुर येथील जनावरांना 100 पोती पशुखाद्य, चादर तर मतदार संघातील लोकांच्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे  ७५ हजार कुटुंबांना वाटप केले आहे.  राजकारणा वेळी राजकारण इतर वेळी समाजकारण करणाऱ्या या नेतृत्वाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

 दिनकरराव पाटील(गुरुजी)
(संचालक विश्वास साखर कारखाना)

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

विशेषवृत्त-लॉकडाऊनच्या काळात महिला बचत गटांनी मास्क विक्रीतून 20 लाखांची केली कमाई 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोरोना योद्धा आमदार मानसिंगराव नाईक वाढदिवस विशेष

इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-===========================================================================
========================================================================
=====================================================================
========================================================================
========================================================================
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
औद्योगीक क्रांतीत भर घालणारे नेतृत्व-अभय पाटील सरपंच औंढी
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
राजकारणा पेक्षा समाजकारणाला प्राधांन्य देणारे नेतृत्व- किर्तीकुमार पाटील उपनगराध्यक्ष  शिराळा नगरपंचायत
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments