BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कोरोना योद्धा आमदार मानसिंगराव नाईक (भाऊ)

===============================================

ब्रेकिंग न्यज

शिराळा तालुक्याती मोहरे व नोटोली येथे दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. ते दोन्ही रुग्ण मुंबईहुन आले आहेत. त्यामुळे मोहरे गावात पुन्हा तर नाटोली गावात प्रथम कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

======================================================================


  स्पष्टवक्तेपणा, निवडणूकीपुरते राजकारण व इतर वेळी समाजकारण करणारे ‘मानसिंगभाऊ’ सर्वांना परिचीत आहे.कोणत्या ही परिस्थिती लढायचेच ही त्यांच्या कामाची धाटणी आहे. अशा बहुआयामी नेतृत्वाचा आज वाढदिवस.त्या निमीत्ताने...


औद्योगिककरणात ‘विश्वास’ व ‘विराज’ उद्योग समुहाने संपूर्ण महाराष्ट्रात गरुडभरारी घेवून अनेक मानांकने प्राप्त केली आहेत. सर्व उद्योग व संस्था यशस्वीपणे चालवून शिराळा सारख्या डोंगराळ तालुक्याला औद्योगिकरणाचा चेहरा दिला आहे. सन 2000 पासून सहकाराबरोबर समाजकारण आणि राजकारणात पर्दापण केलेल्या भाऊंनी अल्पावधीत अमुलाग्र बदल करत काळानुरूप नविन प्रकल्पांची, संस्थांची यशस्वीपणे उभारणी केली.‘विश्वास’ कारखान्यास मिळालेले आय.एस.ओ.व फुड सेफ्टी आय.एस.ओ.मानांकन हे त्यांच्या काम व कष्टाची पोचवावती आहे.
    सन 2000 साली विश्वास कारखान्याची सूत्रे हाती घेतली.मतदार संघातील कुटुंब सक्षमीकरणाला प्राधांन्य दिले. फत्तेसिंगराव नाईक इंडोमंट ट्रस्टच्या माध्यमातून दुर्धर आजारावरील शस्त्रकियांसाठी आर्थिक मदत, कुपनलिका (बोअर), आरेाग्य शिबिरे, पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्याथ्यांना मोफत वही वाटप,शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व परीक्षा, पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृती योजना, रक्तदान, पत्रकार विमा योजना,कुमार-युवा साहित्य संमेलन,किर्तन महोत्सव,खेळ पैठणीचा, मंगळागौरी स्पर्धा, स्वातंत्र्य सेनानी आनंदराव नाईक विशेष गुणवत्ता पुरस्कार, होम मिनिस्टर, कृषी प्रदर्शन आदी विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.
सक्षम लोकप्रतिनीधी
2009 ला भाऊ पहिल्यांदा आमदार झाले. या कालावधीत त्यांनी ज्या गतीने शिराळा मतदार संघाचा विकास केला, असा विकास यापूर्वी जनतेने कधीच पाहिला नव्हाता.पर्यटन विकासमधून शिराळा शहरात 2कोटी 26 लाख रुपयांची विकासकामे साधली. वाकुर्डे बुद्रूक योजनेचे पाणी वाकुर्डे तलावात आणले. गिरजवडे एम.आय.टँक पूर्ण केला. आता पुन्हा आमदार झाल्यानंतर
मार्च 2020 च्या अर्थसंकल्पात वाकुर्डे योजनेसाठी 100 व वारणा प्रकल्पासाठी 100 अशी 200 कोटींची तरतूद जलसपंदा मंत्री मा. ना. जयंतराव पाटील यांच्याकरवी करून घेतली आहे.
मजबुत पक्ष संघटन ः
शिराळा विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. कार्यकर्त्याशी जवळीक व सतत संपर्क हे त्याचे मुख्य कारण आहे.यामुळेच मतदार संघातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती, ग्रामपंचायती, सोसायट्या, नगरपंचायत आदी ठिकाणी मंत्री ना. जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने मतदार संघातील जनतेचा प्रथम क्रमांकाच्या पसंतीचा व सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आहे.
कोवीड योध्दा ः आगळा वेगळा लोकप्रतिनिधी.
 शिराळा तालुका हा डोंगराळ असल्याने उदरनिर्वाहासाठी अनेकांनी  मुंबई गाठली. आता ते चाकरमाने गावी परतले आहेत. कोरोना पार्श्वभुमीवर कोणकोणत्या खबरदार घ्याव्यात यासाठी आमदार मानसिंगराव नाईक यांनी संपूर्ण मतदार संघाचा दौरा केला. या दौर्‍याचा उद्देश जनतेला सावध करणे हाच होता.गावातील सोईच्या ठिकाणी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे लोकप्रतिनिधी व काही महत्वाचे लोक बैठकींना उपस्थित असत.या मंडळींना कोरोनाबाबतच्या उपाय योजना, त्यांनी घेतलेल्या खबरदार्‍या,गावाचे नियोजन,ग्रामपंचायत, नगरपंचायतीची कर्तव्य, त्यांच्या जबाबदार्‍या आदींबाबत माहितीची देवाण घेवाण या दौर्‍यातून केली. त्यांनी स्वतःच्या विराज इंडस्ट्रिजमध्ये सॅनिटायझरची निर्मिती करुन ग्रामपंचायतीला ना नफा, ना तोटा या तत्वार सॅनिटायझारचा पुरवठा केला जात आहे. महसूल, पोलिस, आरोग्य, पंचायत समिती आदी अधिकार्‍यांच्या बैठका घेवून योग्य प्रकारे नियोजन केले.प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र,ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयास भेट देवुन तिथल्या उणीवा दुर करण्याचा प्रयत्न केला.आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका, मदतनिस यांना मास्क व फेस शिल्डचे वाटप केले. संस्था कोरोनटाईन लोकांना चादर व बेडशिट वाटप,नगरपंचायत क्षेत्रातील आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका,अर्धवेळ परिचारिका यांना शासनाने दिलेला प्रत्येकी एक हजार रुपयांचा प्रात्साहन भत्ता मिळत नसल्याने त्यांनी लोकनेते फत्तेसिंगराव नाईक ट्रस्ट मार्फत 36 जनांना तो दिला.कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या मणदर येथील जनावरांना शंभर पोती विराज पशुखाद्य मोफत दिले.
  विश्वास कारखान्याकडे पर जिल्ह्यातून आलेल्या तोडणी कामगार, वाहतूकदार यांना जीवनावश्यक किटचे वाटप करुन त्यांना त्यांच्या गावी एसटीने पाठवण्याची व्यवस्था केली. आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून मतदार संघातील येणार्‍या सर्व 75 हजार कुटुंबांना अर्सिनिक अल्बम 30 या होमीओपॅथी गोळ्या वाटपाचा केले. ग्रामीण भागातील लोकांना अत्यावश्यक उपचार मिळण्यासाठी शिराळा व कोकरुड येथे आसोलेशन कक्ष उभारण्याचे मंत्री मा. ना. जंयतराव पाटील यांच्या करवी मान्य करून घेवुन चांदोली पर्यटन विकासाबाबत शब्द घेवून या विभागातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.अशा या नेतृत्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

                                                            राम पाटील  (कार्यकारी संचालक विश्वास साखर कारखाना)

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

विशेषवृत्त-लॉकडाऊनच्या काळात महिला बचत गटांनी मास्क विक्रीतून 20 लाखांची केली कमाई 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोरोना योद्धा आमदार मानसिंगराव नाईक वाढदिवस विशेष

इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-===========================================================================
========================================================================
=====================================================================
========================================================================
========================================================================
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
औद्योगीक क्रांतीत भर घालणारे नेतृत्व-अभय पाटील सरपंच औंढी
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
राजकारणा पेक्षा समाजकारणाला प्राधांन्य देणारे नेतृत्व- किर्तीकुमार पाटील उपनगराध्यक्ष  शिराळा नगरपंचायत
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments