BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा व कोकरूड येथे अतिदक्षता विभाग सुरू करा- पालकमंत्री जयंतराव पाटील

चांदोली:चांदोली धरणाची पाहणी करताना पालकमंत्री जयंतराव पाटील,आमदार मानसिंगराव नाईक,जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, विराज नाईक


वाचा-तर साहेब तुम्हीच सांगा आम्ही जगायचं कसं -व्यथा कोरोनाग्रस्त गावाची

चांदोली:चांदोली धरणाची पाहणी करताना पालकमंत्री जयंतराव पाटील,आमदार मानसिंगराव नाईक,जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, विराज नाईक
शिराळा,ता.२१: शिराळा तालुक्यातील डोंगरी भागातील लोकांना अतितातडीच्या उपचारासाठी शिराळा व कोकरूड येथे अतिदक्षता विभाग सुरू करण्याबाबतच्या सूचना पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांनी मणदूर येथे दिलेल्या भेटी प्रसंगी बोलत होते. हा डोंगरी व दुर्गम भाग असून मणदूर हे जिल्ह्याचे शेवटचे टोक आहे.  या ठिकाणी अपघात अथवा हृदयविकार, इतर गंभीर आजारी असणा-या रुग्णांना  उपचार   मिळण्यास  विलंब होतो. त्यांना  कराड , कोल्हापूर,  इस्लामपूर  या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी  दीड तासाहून जास्त वेळ लागतो. त्यामुळे अनेक रुग्णांना  वेळेत उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागतो. पश्चिम भागाचे अंतर जास्त असल्याने त्यांच्यासाठी कोकरूड व तालुक्यासाठी म्हणून   शिराळा येथे  अतिदक्षता विभाग सुरू करावा अशी मागणी आमदार मानसिंगराव नाईक यांनी  पालकमंत्री पाटील यांच्याकडे केली. त्यावेळी  या परिसराची भौगोलिक परिस्थिती  व रुग्णाला उपचारासाठी लागणारा  वेळ  पहाता पाटील यांनी  पाहिले शिराळा व नंतर कोकरूड येथे अतिदक्षता विभाग सुरू करण्याबाबत  अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
मणदूर येथे कोरोना बाबतीत काय उपाय योजना केल्या याची माहिती घेतली. नोकरीसाठी बाहेर जाण्यासाठी लागणारे मेडिकल सर्टिफिकेट, दूध संकलन सुरू करणे, मुंबईहून आलेल्या लोकांना रेशननिगचे धान्य देणे बाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
त्यानंतर चांदोली धरणाची पाहणी करून पावसाळ्यात यंत्रणा सतर्क ठेवण्याबाबत सूचना देऊन पर्यटन वाढीबाबत चर्चा केली.  त्यानंतर पाटील यांनी मांगले सावर्डे बंधाऱ्याची पाहणी केली.
यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, विराज नाईक,जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी, मुख्यकार्यकारीअधिकारी चंद्रकांत गुडेलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, जिल्हा शल्यचिकित्सक संजय साळुंखे, सभापती वैशाली माने,पंचायत समिती सदस्य बी. के. नायकवडी,मनीषा गुरव, प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ.अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.मनजीत परब, डॉ.नंदकुमार गवारी, मणदूरचे सरपंच वसंत पाटील,उपसरपंच विजय चौगुले,ग्रामसेवक एम.एन.पाटील,तलाठी भास्कर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर

मांगले- सावर्डे बंधारा दुरुस्ती लवकरच-  जलसंपदामंत्री जयंत पाटील

मोलमजुरी करणाऱ्यांंचा मुलगा 

व -भाजीविक्रेत्या आज्जीचा नातू बनला पोलीस  उपाधिक्षक

----------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------

घागरेवाडीत जनावरांच्या शेडमध्ये घुसला बिबट्या

----------------------------------------------------------------------------------------


Post a Comment

0 Comments