शिराळा, ता.२२: निगडी (ता. शिराळा) येथे मुंबईहुन आलेला ५८वर्षीय एक पुरुष, व मुंबईहून आलेल्या कोरोना बाधित महिलेच्या ९ महिन्याच्या बाळाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मणदूर येथील सहा व माळेवाडी येथील एक असे एकूण ७ कोरोना मुक्त झाले आहेत. तालुक्यातील रुग्णाची संख्या ९९ झाली आहे. आज अखेर तालुक्यातील २० गावे कोरोना बाधित झाली आहेत.
सदर रुग्ण १२ जून रोजी मुंबईहुन आपल्या कुटुंबातील इतर पाच जणांसह येऊन घरीच क्वारंटाईन झाला होता. ५० वर्षावरील व्यक्तींच्या स्वॅब तपासणीत त्यांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील पाच लोकांना शिराळा येथे क्वारंटाईन केले आहे. मुंबईहुन आल्या महिलेला कोरोनाची लागण झाली असून तिच्या संपर्कातील तिच्या ९ महिन्याच्या बाळाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला असून ते बाळ आई सोबत मिरज येथेच आहे. मणदुर येथील 17 वर्षाचा मुलगा, 23,38 वर्षाचा युवक,75 वर्षाचा पुरुष, 24वर्षाची युवती, 60 वर्षाची महिला व माळेवाडी येथील ६० वर्षीय पुरुष असे सात जण कोरोना मुक्त झाले आहेत.
तालुक्यात आज पर्यंत एकूण ९९ रुग्ण तर ५३ कोरोना मुक्त आहेत.
यामध्ये मणदूर येथील ५६ , रिळे येथे ६ , निगडी ७ , किनरेवडी येथे ४ मांगले व रेड येथे प्रत्येकी ३ , शिराळा , मोहरे , खेड , खिरवडे , सोनवडे - ( काळोखेवाडी ) , माळेवाडी येथे प्रत्येकी २ , तर अंत्री खुर्द , करुंगली , चिंचोली , पणुंब्रे तर्फ शिराळा , लादेवाडी , पुनवत , बिळाशी , शिराळे खुर्द येथे प्रत्येकी एक असे ९ ९रुग्ण झाले असून ५३ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत . मोहरे व मणदूर येथील दोघांचा मृत्यू झाला आहे .
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वाचा इतर महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर
वाचा- कहाणी स्मशानातल्या वाढदिवसाची
–-------------------------------------------------------------------------------------
आनंदाची बातमी-शिराळच्या कोविड उपजिल्हा रुग्णालयातून उपचार घेणारे तीन रुग्ण कोरोना मुक्त
----------------------------------------------------------------------------------------
वाचा- बंदिस्त बिबट्याने ठोकली जंगलात धुम
--------------------------------------------------------------------------------------
मांगले- सावर्डे बंधारा दुरुस्ती लवकरच- जलसंपदामंत्री जयंत पाटील
----------------------------------------------------------------------------------------
मोलमजुरी करणाऱ्यांंचा मुलगा
व -भाजीविक्रेत्या आज्जीचा नातू बनला पोलीस उपाधिक्षक
----------------------------------------------------------------------------------------
0 Comments