BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

दुरुस्तीचे काम करत असताना विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू


दुरुस्तीचे काम करत असताना विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू

शिराळा,ता.१:सांगाव ( ता.शिराळा ) येथे शिद वस्तीजवळ विद्युत खांबावर चढून दुरुस्ती चे काम करत असताना अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने विजेचा धक्का बसून वायरमन अक्षय रामराव पाटील ( वय २४ ) रा.कांदे या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटना आज सोमवार रोजी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली.
   याबाबत उपकार्यकरी अभियंता प्रल्हाद बुचडे यांनी शिराळा पोलिसात वर्दी दिली आहे. याबाबत शिराळा पोलिसातून समजलेली माहिती अशी की , सांगाव गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता . त्यामुळे वारणा कॉलनी जवळील शिद वस्तीवरील वीज दुरुस्तीचे काम करण्यासाठी अक्षय पाटील हा खांबावर चढून दुरुस्ती चे काम करत असताना अचानक विजेचा प्रवाह सुरू झाल्याने  विजेचा धक्का बसून तो  विद्युतखांबावरून खाली पडला .त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. उपअभियंता प्रल्हाद बुचडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याच्या पश्चात वडील , आई ,दोन बहिणी असा परिवार आहे. एकुलत्या एका मुलाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने  पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या या दुर्दैवी मृत्यूने कांदे व सागाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.पुढील प्राथमिक तपास सहायक पोलिस फौजदार जी.एस. झांजरे करत आहेत.

आठ दिवसात दुसरी घटना

 सागाव येथे २२ मे रोजी श्रीमती शारदा शिवाजी कुंभार (वय ६२) यांचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. आज वायरमन अक्षय याचा मृत्यू झाल्याने आठ दिवसातील विजेच्या धक्क्याने याच गावात मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे.

Post a Comment

0 Comments