BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पाचगणी येथील सुरेश पाटील यांचे निधन


पाचगणी येथील सुरेश पाटील यांचे निधन

शिराळा, ता.१४: पाचगणी (ता.शिराळा) येथील शिराळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश अनंत पाटील( वय ६२) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई ,मुलगा, पुतणे,भावजय असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी( ता.१६) सकाळी पाचगणी येथे आहे.
सुरेश पाटील हे पाचगणी गावचे  पाच वर्षे  सरपंच, दहा वर्षे सोसायटीचे अध्यक्ष व  शिराळा बाजार समितीचे संचालक होते. ग्रामपंचायत सदस्य १५ वर्षे होते.  करुंगली येथील  दालमिया (निनाईदेवी) कारखान्यात केन इन्स्पेक्टर होते. ते विधानपरिषदचे माजी सभापती स्व.शिवाजीराव देशमुख यांचे कट्टर समर्थक होते. ते गावात परिसरात सुरेश आप्पा म्हणून ओळखले जात होते. शांत,संयमी व सामाजिक क्षेत्रात हिरीरीने भाग घेणारे नेतृत्व म्हणून सर्वत्र परिचित होते.

Post a Comment

0 Comments