BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा नगरपंचायत सभापती निवडी जाहीर

शिराळा: सभापती निवडीनंतर नूतन सभापती सुनीता निकम व इतर सभापती यांचा सत्कार करताना आमदार मानसिंगराव नाईक,सोबत नगराध्यक्षा अर्चना शेटे, बसवेश्वर शेटे, उपनगराध्यक्ष किर्तीकुमार पाटील, चंद्रकांत निकम,प्रमोद पवार

शिराळा नगरपंचायत सभापती निवडी जाहीर

शिराळा, ता.१२:शिराळा नगरपंचायतच्या सभापती निवडी जाहीर करण्यात आल्या असून शिक्षण नियोजन, बांधकाम सभापतीपदी सौ.सुनीता निकम,पाणी पुरवठा सभापतिपदी मोहन जिरंगे, महिला व बालकल्याण सभापतिपदी आशाताई कांबळे, स्वच्छता, वैद्यक,सार्वजनिक आरोग्य व दिवाबत्ती सभापतिपदी किर्तीकुमार पाटील याची बिनविरोध निवड झाली.

पीठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी काम पाहिले. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीकांत लाळगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रांताधिकारी नागेश पाटील व मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांच्या हस्ते नूतन सभापती यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्षा सौ.अर्चना शेटे,  माजी सभापती गौतम पोटे, संजय हिरवडेकर, नगरसेवक विजय दळवी,  अभिजित नाईक, उत्तम डांगे, वैभव गायकवाड, विश्वप्रतापसिंह नाईक, माजी नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के, नगरसेविका प्रतिभा पवार, सुजाता इंगवले,नेहा सुर्यवंशी, राजश्री यादव, सीमा कदम,अधीक्षक  राजकन्या कुलकर्णी, प्रिती पाटील,काजोल शिंदे उपस्थित होते.
निवडीनंतर नूतन सभापती यांनी चिखली येथे जाऊन आमदार मानसिंगराव नाईक यांची भेट घेतली.त्यावेळी नाईक यांच्या हस्ते नूतन सभापती यांचा सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments