दोन हजाराची लाच स्वीकारताना तलाठी लाच लुचपतच्या जाळ्यात
शिराळा, ता.१: नाटोली (ता शिराळा ) येथील जमीनीच्या सर्व्हे नंबर व सातबारा चुक दुरस्ती करण्यासाठी भगवानसिंग व्यंकटसिंग राजपूत( वय ३०) या तालाठ्याने दोन हजाराची लाच घेतल्या प्रकरणी सांगलीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. त्याच्यावर शिराळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत समजलेली माहिती अशी, तक्रारदार यांच्या वडीलांनी तलाठी कार्यालय नाटोली येथे शेत जमीनच्या सहें नंबर व सातबारा चुक दुरस्ती करणेबाबत अर्ज केला होता . सदरची चुक दुरूस्ती करून सातबारा उतारा देण्या करीता तलाठी राजपूत यांनी ५००० रूपचे लाचेची मागणी केली असल्याची तक्रारदार यांनी दि .०१.०६.२०२० दिली होती. त्यानुसारी ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यात. राजपूती यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रथम ५००० रूपये लाचेची मागणी केली. परंतु चर्चे अंती ४०००- रूपये लाचेची मागणी करून त्यापैकी २००० रूपये लागलीच घेवून येण्यास सांगीतलेचे निष्पन्न झाले . त्या नंतर नाटोली तलाठी कार्यालयात सापळा लावला. त्यावेळी राजपूत यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून त्यांच्याकडून २००० रूपये लाच रक्कम स्विकारले असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे .लाच प्रकरणी राजपूत यांचेवर शिराळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त, पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे , अपर पोलीस उप आयुक्त, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती सुषमा चव्हाण लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुरूदत्त मोरे, प्रशांत चौगुले, पोलीस पोलीस कर्मचारी अविनाश सागर , रविंद्र धुमाळ , संजय कलकुटगी , संजय संकपाळ , राधिका माने , सिमा माने , चालक बाळासाहेब पवार यांनी केली आहे .
0 Comments