करमजाई व टाकवे तलाव पूर्ण क्षमतेने भरला
----------------------------------------------------------------------------------
तालुक्यात पाच कोरोना पॉझिटिव्ह तर चार कोरोना मुक्त
शिराळा,ता.१९: शिराळा तालुक्यातील मणदूर येथील चार तर निगडी येथे मुंबईहून आलेल्या ३२वर्षीय युवतीचा असा एकूण पाच जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे निगडी गावात पुन्हा एक वेळ कोरोनाचा शिरकाव झाला आहे . मणदूर चार जण कोरोना मुक्त झाले आहेत.
त्यामुळे शिराळा तालुक्याची वाटचाल शतकाकडे चालू आहे.
तालुक्यातील रुग्णाची संख्या ९५ तर पश्चिम भागातील रुग्णांची संख्या ७६ झाली आहे. आज अखेर तालुक्यातील १९ गावे कोरोना बाधित झाली आहेत.
सदरची महिला १० जून रोजी आपल्या कुटुंबातील इतर सहा जणांन बरोबर मुंबईवरून येऊन घरी क्वारं टाईन झाली होती. तिला बुधवारी १७ जून रोजी त्रास जाणवू लागल्याने तिचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला होता .त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे . तीन महिन्यापूर्वी २४ एप्रिल ला मुंबईहून आलेल्या युवतीमुळे शिराळा तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर तिच्या संपर्कातील एक महिला व त्यानंतर मुंबईहून आलेल्या पण जांभूळवाडी ता.वाळवा येथे क्वारंटाईन झालेल्या पती पत्नीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने निगडी येथील कंटेंमेंट झोन रद्द करण्यात आला होता. आज पुन्हा रुग्ण सापडल्याने पुनः कंटेंमेंट अमलबजावणी सुरू झाली आहे. मणदूर येथील ३७ वर्षीय पुरुष,८ वर्षाचा मुलगा, २७ व ३३ वर्षीय महिला हे चार रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.तर १६ व १७ वर्षीय युवती, ३८ व ४० वर्षाचे युवक हे कोरोना मुक्त झाले आहेत.
रिळे येथील ७० वर्षीय पुरुष यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
तालुक्यात निगडी ५ , रेड ३ , अंत्री खुर्द १ , मोहरे २ , खिरवडे २, करुंगली १ , चिंचोली १ , मणदूर ५५ काळोखेवाडी २, रिळे ६,माळेवाडी२,मांगले ३ ,किनरेवाडी ४, लादेवाडी १,खेड २,पणुंब्रे तर्फ शिराळा १,पुनवत १,बिळाशी १ ,शिराळा २असे एकूण ९०रुग्ण झाले आहेत.
निगडी ३,रेड३,चिंचोली १,करुंगली १, मोहरे १,मणदूर १९, खिरवडे २,रिळे ३,माळेवाडी १, काळोखेवाडी २,मांगले ३असे ३५ कोरोना मुक्त झाले आहेत.
तालुक्यातील एकूण रुग्ण ९५
कोरोना मुक्त ३९
कोरोनामुळे मृत २
अतिदक्षता विभागात १
@ इतर महत्वाच्या बातम्या @
किनरेवाडीत २ तर मणदूरला १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह
---------------------------------------------------------------------------------------
-
0 Comments