मणदूरमध्ये कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
शिराळा, ता. २: मणदूर ( ता.शिराळा) येथे कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे.कंटेनमेंट झोन मध्ये शामराव ज्ञानू सावंत यांचे घर ते संपत गणपती पाटील यांचे घर. संपत गणपती पाटील यांचे घर ते मारूती श्रीपती चौगुले यांचे घर. मारूती श्रीपती चौगुले यांचे घर ते शामराव ज्ञानू पाटील यांचे घर.शामराव ज्ञानू पाटील यांचे घर ते शामराव ज्ञानू सावंत यांचे घर.
बफर झोन मध्ये रामचंद्र जर्नादन गुरव यांची जमीन ते ईश्वर रावजी नायकवडी यांची जमीन. ईश्वर रावजी नायकवडी यांची जमीन ते तानाजी विठू पाटील यांची जमीन. तानाजी विठू पाटील यांची जमीन ते केशव गणपती कांबळे यांची जमीन.केशव गणपती कांबळे यांची जमीन ते रामचंद्र जर्नादन गुरव यांची जमीन. या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
0 Comments