पत्नी कोरोना मुक्त मात्र पतीची प्रकृती चिंताजनक
शिराळा, ता.३०:खिरवडे (ता.शिराळा) येथील कोरोना बाधित असलेली ५२ वर्षीय महिला आज कोरोना मुक्त झाली आहे. मात्र कोरोना बाधित असलेल्या ५६वर्षीय पतीची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे.सदर ५६ वर्षीय रुग्ण २१मे रोजी मुंबईहून येऊन आपल्या कुटुंबातील चार व्यक्तीसह घरी क्वारंटाईन झाली होता. त्यास त्रास होऊ लागल्याने मिरज येथे पाठवण्यात आले होते.त्या ठिकाणी कोरोनाची चाचणी घेण्यात आली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
त्यांच्या संपर्कातील कुटुंबातील ५ जणांचे शिराळा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहात संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांच्या पत्नीला त्रास जाणवू लागल्याने तिला मिरज येथे पाठवण्यात आले होते. तिचा कोरोना चाचणी अहवाल ३० मे रोजी पॉझिटिव्ह आला होता.
तिच्या पतीवर मिरज येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती अद्याप चिंताजनक आहे.मात्र त्यांच्या ५२ वर्षीय पत्नीने आज कोरोनावर मात केली आहे.त्यामुळे तालुक्यातील कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या ११ झाली आहे.
0 Comments