BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

असा झाला बिबट्या जेरबंद



शिराळा: घागरेवाडी येथे सापळ्यात जेरबंद केलेला बिबट्याचा शिराळा येथील वनविभागाच्या कार्यालयात आणण्यात आला आहे.


असा झाला बिबट्या जेरबंद

शिराळा: घागरेवाडी (ता.शिराळा) येथे चौगुले गल्लीतील दिलीप घागरे व वसंत घागरे यांच्या जनावरांच्या गोठ्यात  घुसलेल्या बिबट्यास रात्री साडे बारा वाजता वनविभागाने सापळा लावून जेरबंद केले
सदरचा बिबट्या मादी मादी असून एक ते सव्वा वर्ष वय आहे .  बिबट्याला सापळा लावून पकडण्याची तालुक्यातील ही पहिली घटना आहे.
काल गुरूवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घागरेवाडी परिसरात आलेला बिबट्या कुत्री पाठीमागे लागल्याने गल्ली घुसला. त्यावेळी गल्लीतील लोकांनी दंगा केल्याने जवळच असणाऱ्या दिलीप व वसंत घागरे  यांच्या जनावरांच्या शेड मध्ये घुसला. त्यावेळी दिलीप यांनी प्रसंगावधान राखून गोठ्याची चौकट ,काँट लावून बंद केली. या बाबत ग्रामस्थ व जयवंत चौगुले यांनी  वन विभागांशी संपर्क साधला .

शिराळा कंटेंमेंट व बफर झोन वाचा

         त्यावेळी वनक्षेत्रपाल सुशांत काळे ,सामाजिक वनीकरण वनक्षेत्रपाल रविकांत भगत ,  वनपाल चंद्रकांत देशमुख ,वनरक्षकसचिन पाटील, पी.एन.पाटील  देवकी तासीलदार,रेहना पाटोळे,अमोल साठे,उस्मान मुल्ला ,प्रकाश पाटील, वनकर्मचारी संपत देसाई,शहाजी पाटील,आदिक शेटके, अनिल पाटील,दादा शेटके, बाबा गायकवाड, बाळू चव्हाण, शिवाजी खोत, तानाजी पाटील,पोलीस कर्मचारी विकास नांगरे, सुशांत जाधव, शरद पाटील, जगदाळे, सुभाष जाधव व इतर कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
             त्यानंतर  गोठ्यातील सात जनावरे बाहेर काढण्यात आली. बिबट्या असलेल्या जागी जाळी लावण्यात आली.  जाळीच्या साहायाने गोठयातील वैरण बाहेर काढण्यात आली .रात्री साडे दहा वाजता शिराळा येथून सापळा आणून लावला. काही काळ बिबट्या माळ्यावर बसला. सर्वजण दीड तास शांत बसले. सर्व वातावरण शांत झाल्याने रात्री साडे बारा वाजता बिबट्या सापळ्यात जेरबंद झाला. त्यामुळे ग्रामस्थांनी व वन विभागाने सुटकेचा श्वास सोडला.
          यावेळी सरपंच उषाताई घागरे ,पोलीस पाटील मोहन घागरे,मारुती घागरे, रोहित ,घागरे, ,,आनंदा घागरे, जयवंत चौगुले,बाजीराव चौगुले, बजरंग चौगुले, संजय चौगुले व तरुण मंडळी यांनी विशेष सहकार्य केले.
      हा बिबट्या रात्रीच जेरबंद करून शिराळा येथील वनविभागाच्या कार्यालयात आणला आहे. सकाळी पशुधन  विकास अधिकारी डॉ.विशाल गावडे यांनी  बिबट्याची तपासणी केली. त्याची प्रकृती सुस्थितीत आहे. वरीष्ठ अधिकारी यांच्या सूचनेनुसार त्या कुठे सोडायचा हा निर्णय घेतला जाणार आहे.
     उपवनसंरक्षक , सांगली वनविभाग पी.बी.धानके, सहायक वनसंरक्षक जी.एस.चव्हाण यांनी शिराळा येथे भेट देऊन पाहणी केली.

@ इतर महत्वाच्या बातम्या @

किनरेवाडीत २ तर मणदूरला १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह


Post a Comment

0 Comments