BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

घागरेवाडीत बिबट्या जेरबंद



घागरेवाडीत बिबट्या जेरबंद

घागरेवाडी (ता.शिराळा) येथे चौगुले गल्लीतील दिलीप घागरे व वसंत घागरे यांच्या जनावरांच्या याच शेड मध्ये बिबट्याचा घुसला होता.

शिराळा: घागरेवाडी (ता.शिराळा) येथे चौगुले गल्लीतील दिलीप घागरे व वसंत घागरे यांच्या जनावरांच्या गोठ्यात  घुसलेल्याबिबट्यास रात्री साडे बारा वाजता वनविभागाने सापळा लावून जेरबंद केले.
         काल गुरूवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कुत्री पाठीमागे लागल्याने  बिबट्या गल्ली घुसला. त्यावेळी गल्लीतील लोकांनी दंगा केल्याने जवळच असणाऱ्या दिलीप व वसंत घागरे  यांच्या जनावरांच्या शेड मध्ये घुसला. या बाबत ग्रामस्थ व जयवंत चौगुले यांनी  वन विभागांशी संपर्क साधला .
            त्यावेळी वनक्षेत्रपाल सुशांत काळे ,सामाजिक वनीकरण वनक्षेत्रपाल रविकांत भगत ,  वनपाल चंद्रकांत देशमुख ,वनरक्षकसचिन पाटील, पी.एन.पाटील  देवकी तासीलदार,रेहना पाटोळे,अमोल साठे, वनकर्मचारी संपत देसाई,शहाजी पाटील,आदिक शेटके, अनिल पाटील,दादा शेटके, बाबा गायकवाड, बाळू चव्हाण, शिवाजी खोत, तानाजी पाटील,पोलीस कर्मचारी विकास नांगरे, सुशांत जाधव, शरद पाटील, जगदाळे, सुभाष जाधव व इतर कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. 
    त्यानंतर गोठ्यातील सात जनावरे बाहेर काढण्यात आली. बिबट्या असलेल्या जागी जाळी लावण्यात आली. रात्री साडे दहा वाजता शिराळा येथून सापळा आणण्यात आला. त्यानंतर दिड तासाच्या अथक प्रयत्नाने  रात्री साडे बारा वाजता बिबट्यास जेरबंद केले. त्यामुळे ग्रामस्थांनी व वन विभागाने सुटकेचा श्वास सोडला.
----------------------------------------------------------------------------------------
वाचा-------

शिराळा कंटेंमेंट व बफर झोन वाचा

----------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

1 Comments