घागरेवाडी (ता.शिराळा) येथे चौगुले गल्लीतील दिलीप घागरे व वसंत घागरे यांच्या जनावरांच्या गोठ्यात शिरलेल्या बिबट्या जेरबंद करण्यासाठी जमलेले वनविभाग व पोलीस कर्मचारी
आज गुरूवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कुत्री पाठीमागे लागल्याने बिबट्या गल्ली घुसला. त्यावेळी गल्लीतील लोकांनी दंगा केल्याने जवळच असणाऱ्या दिलीप व वसंत घागरे यांच्या जनावरांच्या शेड मध्ये घुसला. या बाबत ग्रामस्थ व जयवंत चौगुले यांनी वन विभागांशी संपर्क साधला . त्यावेळी वनक्षेत्रपाल सुशांत काळे ,सामाजिक वनीकरण वनक्षेत्रपाल रविकांत भगत , वनपाल चंद्रकांत देशमुख ,वनरक्षकसचिन पाटील, पी.एन.पाटील देवकी तासीलदार,रेहना पाटोळे,अमोल साठे, वनकर्मचारी संपत देसाई,शहाजी पाटील,आदिक शेटके, अनिल पाटील,दादा शेटके, बाबा गायकवाड, बाळू चव्हाण, शिवाजी खोत, तानाजी पाटील,पोलीस कर्मचारी विकास नांगरे, सुशांत जाधव, शरद पाटील, जगदाळे, सुभाष जाधव व इतर कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर गोठ्यातील सात जनावरे बाहेर काढण्यात आली. बिबट्या असलेल्या जागी जाळी लावण्यात आली. रात्री साडे दहा वाजता शिराळा येथून सापळा आणण्यात आला. त्यानंतर रात्री उशिराला पर्यंत त्यास पकडण्याचे प्रयत्न सुरू होते.
जनावरांच्या गोठ्यात घुसला बिबट्या
शिराळा: घागरेवाडी (ता.शिराळा) येथे चौगुले गल्लीतील दिलीप घागरे व वसंत घागरे यांच्या जनावरांच्या गोठ्यात बिबट्या आढळून आला आहे.आज गुरूवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कुत्री पाठीमागे लागल्याने बिबट्या गल्ली घुसला. त्यावेळी गल्लीतील लोकांनी दंगा केल्याने जवळच असणाऱ्या दिलीप व वसंत घागरे यांच्या जनावरांच्या शेड मध्ये घुसला. या बाबत ग्रामस्थ व जयवंत चौगुले यांनी वन विभागांशी संपर्क साधला . त्यावेळी वनक्षेत्रपाल सुशांत काळे ,सामाजिक वनीकरण वनक्षेत्रपाल रविकांत भगत , वनपाल चंद्रकांत देशमुख ,वनरक्षकसचिन पाटील, पी.एन.पाटील देवकी तासीलदार,रेहना पाटोळे,अमोल साठे, वनकर्मचारी संपत देसाई,शहाजी पाटील,आदिक शेटके, अनिल पाटील,दादा शेटके, बाबा गायकवाड, बाळू चव्हाण, शिवाजी खोत, तानाजी पाटील,पोलीस कर्मचारी विकास नांगरे, सुशांत जाधव, शरद पाटील, जगदाळे, सुभाष जाधव व इतर कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर गोठ्यातील सात जनावरे बाहेर काढण्यात आली. बिबट्या असलेल्या जागी जाळी लावण्यात आली. रात्री साडे दहा वाजता शिराळा येथून सापळा आणण्यात आला. त्यानंतर रात्री उशिराला पर्यंत त्यास पकडण्याचे प्रयत्न सुरू होते.
0 Comments