BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कै. विश्वासराव नाईक (भाऊ) यांना अभिवादन

कै. विश्वासभाऊ नाईक यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करताना आमदार मानसिंगराव नाईक. शेजारी इतर मान्यवर.

 कै. विश्वासराव नाईक (भाऊ) यांना अभिवादन

शिराळा (प्रतिनिधी) : विश्वासरावभाऊंनी अंगिकरलेला जनसेवेचे वसा अखंड ठेवला आहे, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
आज १५ जून चिखली (ता. शिराळा) येथे विश्वासराव नाईक कारखाण्याचे संस्थापक कै. विश्वासराव नाईक (भाऊ) यांच्या जयंतीनिमित्त ते बोलत होते.
आमदार नाईक म्हणाले, विश्वासभाऊंनी शेतकरी व सर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू मानला होता. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अखंडपणे प्रयत्न केले. कै. भाऊंनी दाखवलेल्या मार्गाने विश्वास व विराज उद्योग समूहने वाटचाल सुरू ठेवली आहे. शेतकरी विकासाचा केंद्रबिंदू मानला आहे.
प्रारंभी आमदार नाईक यांनी कै. विश्वासभाऊंच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण केले. या वेळी लोकनेते फत्तेसिंगराव नाईक दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंग नाईक, प्रचीती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रसिंग नाईक, माजी सभापती व प. स. सदस्य सम्राटसिंग नाईक, विवेक नाईक, कार्यकारी संचालक राम पाटील, सचिव सचिन पाटील, विराज इंडस्ट्रीजचे सरव्यवस्थापक वाय. बी. गायकवाड, कामगार संचालक दत्तात्रय पाटील, कारखाण्याचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी, सभासद आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments