हे मंडळ का लावणार देशी झाडे
शिराळा:कोरोना महामारी च्या महायुद्धात यावेळी जागतिक पर्यावरण दिन अडकला आहे.पण शिराळा येथे महाजन कन्सर्न्स व विवेकानंद मंडळाच्या वतीने हा दिवस साजरा करण्यात आला.यावेळी ग्राहकांना सिताफळाची झाडे देण्यात आली.तर कर्मचाऱ्यांच्या हस्ते देशी झाडे लावण्यात आली.येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड चे गॅस वितरक महाजन कन्सर्न्स व विवेकानंद सांस्कृतिक क्रीडा व सेवा मंडळ च्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी पर्यावरण दिन संपन्न केला जातो.दरवर्षी विविध शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विवेकानंद वृक्ष संगोपन स्पर्धा आयोजीत केल्या जातात हे १६ वे वर्ष आहे.पण या करोना महामारी मुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.घरात रहा -सुरक्षीत रहा हि सुचना असलेने महाजन कन्सर्न्स व विवेकानंद मंडळाने या स्पर्धा ग्राहक व कर्मचाऱ्यांच्या मध्ये घेण्याचे नियोजन केले आहे.
या वर्षांपासून केवळ देशी झाडे लावण्यात येणार आहेत.आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्राहकांना झाडे देण्यात आली.त्यांनी ती झाडे घरात लावून जगवणे गरजेचे आहे.तसेच कर्मचार्यांना झाडे देण्यात आली.जे ग्राहक व कर्मचारी चांगले झाड जोपासतील त्यांना विवेकानंद व्याख्यानमालेत गौरवण्यात येणार आहे.येणार्या एक महिन्यात काही ग्राहकांना झाडे पोहोच केली जाणार आहेत.
हा कार्यक्रम सकाळी संपन्न झाला.यावेळी विवेकानंद मंडळाचे कार्याध्यक्ष सुमंत महाजन म्हणाले की यावर्षा पासुन केवळ देशी झाडे जोपासण्याचा संकल्प केला आहे. मादागास्कर येथुन हिंदुस्थानात आलेले गुलमोहर,आॅस्ट्रेलियातुन आणले निलगिरी,१०७२ दुष्काळात आयात केलेल्या गव्हा(मिलो) बरोबर भारतात आलेली सुबाभूळ, पेल्ट्रोफोरम,. अकेशिया, स्पँथोडिया, कॅशिया,ग्लिरिसिडिया,फायकस,सत्पपर्णी,रेनट्री अशा झाडांनी आज हजारो एकर जमीन व्यापली आहे या झाडाच्या आम्लयुक्त पानांमुळे आपल्या आसपासची जमीन नापीक झालेली आहे.
दक्षिण अमेरिकेतुन आपल्या कडे आलेल्या गव्हा बरोबर पार्थेनियम तण बी च्या स्वरुपात आपल्याकडे आले आणि पर्यावरणाची वाट लावली.हे गवत म्हणजे काँग्रेस गवत होय.यामुळे उत्पादन क्षमता कमी झाली आहे.हे गवत आपल्या कडील नसल्याने त्याला खाऊन फस्त करणारे जीवच इथल्या स्थानिक अन्नसाखळीत नांदत नसल्याने त्याची बेसुमार वाढ झाली आहे.
विदेशी झाडांमुळे जीवनचक्रावर विपरीत परिणाम झाला आहे.या झाडाच्या फुलात परागकण नसल्याने त्यावर फुलपाखरू, मधमाशी अन्य किटक येत नाही.या झाडावर पक्षी बसत नाहीत.याची पाने जनावरे खात नाहीत यामुळे निसर्ग साखळी व अन्नसाखळी कमकुवत झाली आहे.परदेशी झाडांची पाने , फुले,शेंगा गाय,बैल,शेळी खात नाहीत,माकडे या झाडांवर बसत नाहीत, याचमुळे अन्नसाखळीतील एकमेकांवर अवलंबून असणारे अनेक जीव नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
ग्लिरिसिडिया सारख्या झाडाच्या फुलावरून उंदीर, घुशी गेल्या तर अपंग होतात किंवा मरतात.या झाडाच्या खाली उभारले तर धाप लागते.या झाडातुन विषारी वायू उत्सर्जित केला जातो.अशा अनेक कारणांमुळे विदेशी झाडे जोपासली जाणार नाहीत असे मंडळाने ठरवले आहे.
या ऐवजी पांगारा,सावर, सीताफळ,चिंच जांभूळ,कोकम, कडूनिंब,करंज,बहावा,उंबर,पिंपळ,कांचन,आपटा, इत्यादी झाडे दिली जाणार आहेत असे महाजन यांनी सांगितले.या कार्यक्रमाला ग्राहक, सर्व कर्मचारी, संतोष देशपांडे उपस्थित होते.नियोजन स्वानंद महाजन, श्रेयस महाजन यांनी केले.
0 Comments