बंदिस्त बिबट्याची जंगलात धूम
शिराळा,ता.२०:घागरेवाडी (ता.शिराळा) येथे वनविभागाने सापळा लावून जेरबंद केलेल्या बिबट्यास नैसर्गिक आदिवसात मुक्त करण्यात आले.
गुरूवारी रात्री सव्वा ते एक वर्षाच्या बिबट्याच्या मादीस वनविभागाने सापळा लावून पकडून शिराळा येथील वनविभागाच्या कार्यालयात आणले होते. त्यानंतर त्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे रीतसर परवानगी मागण्यात आली. ती मिळाल्यानंतर उपवनसंरक्षक पी .बी. धानके,सहायक वनसंरक्षक जी.एस.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल सुशांत काळे,वनपाल चंद्रकांत देशमुख ,वनरक्षक सचिन पाटील,अमोल साठे, बाबा गायकवाड, संपत देसाई यांनी नैसर्गिक अधिवासात सोडले. त्यानंतर सापळ्यात बंदिस्त असणाऱ्या बिबट्याने जंगलात धूम ठोकली.
गुरूवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घागरेवाडी परिसरात आलेला बिबट्या कुत्री पाठीमागे लागल्याने गल्ली घुसला होता. त्याला पाहताच गल्लीतील लोकांनी दंगा केल्याने जवळच असणाऱ्या दिलीप व वसंत घागरे यांच्या जनावरांच्या शेड मध्ये घुसला. त्यावेळी दिलीप यांनी प्रसंगावधान राखून गोठ्याची चौकट काँट लावून बंद केली. या बाबत ग्रामस्थ व जयवंत चौगुले यांनी वन विभागांशी संपर्क साधला . त्यावेळी वनक्षेत्रपाल सुशांत काळे ,सामाजिक वनीकरण वनक्षेत्रपाल रविकांत भगत , वनपाल चंद्रकांत देशमुख ,वनरक्षक सचिन पाटील, पी.एन.पाटील देवकी ताशीलदार,रेहना पाटोळे,अमोल साठे,उस्मान मुल्ला ,प्रकाश पाटील, वनकर्मचारी संपत देसाई,शहाजी पाटील,आदिक शेटके, अनिल पाटील,दादा शेटके, बाबा गायकवाड, बाळू चव्हाण, शिवाजी खोत, तानाजी पाटील,पोलीस कर्मचारी विकास नांगरे, सुशांत जाधव, शरद पाटील, जगदाळे, सुभाष जाधव व इतर कर्मचारी यांनी दिड तास वातावरण शांत ठेवून रात्री साडे बारा वाजता बिबट्या सापळ्यात जेरबंद केले होते. यावेळी सरपंच उषाताई घागरे ,पोलीस पाटील मोहन घागरे,मारुती घागरे, रोहित ,घागरे, ,,आनंदा घागरे, जयवंत चौगुले,बाजीराव चौगुले, बजरंग चौगुले, संजय चौगुले व तरुण मंडळी यांनी विशेष सहकार्य केले.
हा बिबट्यास शिराळा येथील वनविभागाच्या कार्यालयात आणून शुक्रवारी सकाळी पशुधन विकास अधिकारी डॉ.विशाल गावडे यांच्या मार्फत तपासणी केली. त्याची प्रकृती सुस्थितीत होती. वरीष्ठ कार्यालयाचा परवानगी नुसार त्यास नैसर्गिक आदिवासात सोडण्यात आले.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
0 Comments