राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील (काका) यांचा सत्कार करताना आमदार मानसिंगराव नाईक. शेजारी उपस्थित इतर मान्यवर.
शिराळा (प्रतिनिधी) : शिराळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरू केलेल्या अभिप्राय अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी होईल, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
चिखली (ता. शिराळा) येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील (काका) प्रमुख उपस्थितीत होते.
आमदार नाईक म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने २१ व्या वर्धापनदिनानिमित्त अभिप्राय अभियानाची सुरवात केली आहे. अभिप्राय नोंदणीचे काम सुरू असून ते अधिक गतिमान केले जाईल. शिराळा तालुक्यात किंबहूना मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वात प्रभावी आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री मा. जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा मतदारसंघात विकासात्मक बदल होत आहेत. राज्यातील महाआघाडी सरकारकडून विकासाला साथ मिळत आहे. शेतकरी, कष्टकरी व सार्वजनिक हिताचे निर्णय घेतले जात आहेत.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. जिल्हाध्यक्ष पाटील व जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक यांचा सत्कार आमदार मानसिंगभाऊ यांनी केला. जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष छायाताई पाटील, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भरत देशमुख व राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष पूजा लाड, तालुक्याचे माजी सभापती, प. स. सदस्य सम्राटसिंग नाईक, महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष रुपाली भोसले आदी उपस्थित होते. युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राहुल पवार यांनी आभार मानले.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर
=====================================================================
निगडी येथे दोन कोरोना पॉझिटीव्ह तर तालुक्यातील 7 कोरोना मुक्त 22.6.20
========================================================================
वाचा- कहाणी स्मशानातल्या वाढदिवसाची
========================================================================
आनंदाची बातमी-शिराळच्या कोविड उपजिल्हा रुग्णालयातून उपचार घेणारे तीन रुग्ण कोरोना मुक्त
===============================================
=====================================================================
मांगले- सावर्डे बंधारा दुरुस्ती लवकरच- जलसंपदामंत्री जयंत पाटील
=======================================================================
मोलमजुरी करणाऱ्यांंचा मुलगा
व -भाजीविक्रेत्या आज्जीचा नातू बनला पोलीस उपाधिक्षक
=====================================================================
हा तालुका आहे जिल्ह्यात कोरोना रुग्णात नंबर वन
==============================================
घागरेवाडीत जनावरांच्या शेडमध्ये घुसला बिबट्या
========================================================================
0 Comments