----------------------------------------------------------------------------------------
ब्रेकिंग न्यूज
कोकरूड येथील त्या कोरोनाबाधित युवकाच्या मुलाचा व पत्नीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
----------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याची पश्चिम दिशा म्हणजे शिराळा तालुका आणि जिल्हा व तालुक्याचे पश्चिम उत्तर टोक म्हणजे कोकणचे प्रवेशद्वार म्हणजेच बत्तीस शिराळा तालुका आणि याच प्रवेशद्वारावर कोंडाईवाडी हे गाव आहे. या गावातील एक युवती माधुरी लाड लॉकडाऊन काळात आपल्या गावी आली आहे. शिराळा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. सध्या तालुक्यात मान्सून देखील संततधार बरसत आहे. या पावसात माधुरीला तिच्या आसपासच्या निसर्गाने अक्षरशः वेड लागले. या वेडापायी तिने गावच्या जवळचे सगळे डोंगर, दऱ्या, टेकड्या पदांक्रात केल्या. ही भटकंती करत असताना तिने या डोंगर दऱ्यातील प्राणी, पक्षी, वनस्पती, फुले आपल्या मोबाईल मधील कॅमेरामध्ये बंदिस्त करत त्याचे फोटो फेसबुक वरती पोस्ट केलेले.फेसबुक वरती पोस्ट केलेले फोटो शिराळा येथील विनायक गायकवाड यांनी पाहिले.
या फुलांच्या फोटोमध्ये त्यांना वेगळेपण जाणवल्यामुळे त्याची माहिती त्यांनी निसर्ग अभ्यासक व प्लॅनेट अर्थ फाऊंडेशनचे प्रणव महाजन, तसेच दिनेश हसबनीस, विकास शहा, विठ्ठल नलवडे, नेहा हसबनीस यांना दिली. त्यांनी तत्काळ कोंडाईवाडी परिसरात अभ्यासासाठी जाण्याचे निश्चित केले. त्यानुसार माधुरी लाड, मनोहर लाड, दिनेश हसबनीस, विकास शहा, विनायक गायकवाड, नेहा हसबनीस, विठ्ठल नलवडे हे त्या परिसरात पोहोचले.
त्याठिकाणी गेल्यानंतर निसर्ग व वनस्पती अभ्यासक प्रणव महाजन यांनी माधुरी लाड यांच्या फेसबुकवर पोस्ट केलेल्या फोटोतील फुलांच्या ठिकाणची माहिती घेत असताना त्यांना येथील परिसरात व डोंगर, दऱ्या, टेकड्यावर फिरताना दुर्मिळ अशा ऑर्किड, दगडीपाला, गुलबक्षी, चित्रक, बोगनवेल, एपिजीना, तगर, पापयी, देंद्रोडियम, हरबनारिया, रान हळद, भरांगी ही दुर्मिळ तर धोतरा, चाफा, रुई, अबोली, कंगुण्या, सदाफुली, सोनेरी, मोगरा या फुल जातीय वनस्पती तिथे आढळून आल्या. तसेच काही ठिकाणी दुर्मिळ व लुप्त होत चाललेली फुलपाखरे, कीटक व बेडूक देखील निदर्शनास आली.
निसर्ग अभ्यासक प्रणव महाजन यांच्या मते शिराळा तालुक्यातील कोंडाईवाडी, धामवडे, गिरजवडे, मांगरूळ या परिसरातील शेती, डोंगर, दऱ्या, पाणवठे, टेकड्या आणि पठारे यावर आढळणारी फुले, पक्षी, फुलपाखरे, किटक आणि वनस्पती यातील काही प्रजाती दुर्मिळ आणि लुप्त होत आहेत. याचा संरक्षण, अभ्यास व निरीक्षण करणे करिता हा परिसर अभ्यासक, निरीक्षक व प्राणी, वनस्पती मित्र यांना अत्यंत योग्य आहे. पावसाळ्यातील जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हा कालावधी याकरिता अत्यंत योग्य आहे. तालुक्यातील पश्चिम उत्तर विभागात ही जैवविविधता मोठ्या प्रमाणात आढळते. हे आजवर कोणालाही माहित नव्हते. ती माहिती माधुरी लाड हिच्या एका फेसबुक पोष्टमुळे जगासमोर आली आहे. तिच्या फेसबुक पोस्ट मुळे अनेकांनी या फुलांचे स्टेटस् आपल्या व्हॉटस्प, एफबी, ट्विटर वर ठेवले आहेत. त्यामुळे तिला मुंबई पुण्यासह इतर भागातून माहितीसाठी संपर्क होऊ लागला आहे.
कोंडाईवाडी प्रमाणेच तालुक्यात मांगरुळ, इंग्रुळ, गुढे, पाचगणी पठार, चांदोली अभयारण्य परिसर याठिकाणी देखील जैव विविधता विपुल प्रमाणात आढळते. कास, महाबळेश्वर, मसाई, पाचगणी येथील धर्तीवर अभ्यासक व निरीक्षक शिराळा तालुक्यातील वरील ठिकाणी येऊन अभ्यास व संशोधन, संरक्षण करू शकतात. त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. माधुरी लाड नावाच्या एका युवतीच्या फेसबुक पोस्ट मुळे ही चांगली संधी सगळ्यांना उपलब्ध होत आहे. हे तालुक्याच्या नैसर्गिक पर्यटन वाढीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.
विनायक गायकवाड(अध्यक्ष प्रेस क्लब ऑफ शिराळा)
=====================================================================
खालील हेडींगवर क्लिक करुन वाचा या आठवड्यातील इतर महत्वाच्या बातम्या
=====================================================================
=====================================================================
प्राथमिक आरोग्य केंद्राला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागणाऱ्या सुविधांचा पाठपुरावा करू - जि.प. सदस्या अशाताई झिमूर
----------------------------------------------------------------------------------------------------------------------कोंडाईवाडीच्या रानफुलांची भुरळ
=======================================================================
भुताचा उताराच त्या युवकांनी पळवला अन्-
---------------------------------------------------------------------------------------------------------------------चिखली येथे २०० हून अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान
=====================================================================
ऐतवडेत ओढ्यावर श्रमदानातून वनराई बंधारा
---------------------------------------------------------------------------------------
विशेषवृत्त-लॉकडाऊनच्या काळात महिला बचत गटांनी मास्क विक्रीतून 20 लाखांची केली कमाई
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कोरोना योद्धा आमदार मानसिंगराव नाईक वाढदिवस विशेष
इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-===========================================================================
========================================================================
मतदार संघाला कुटुंब मानुन सुख दु:खात सदैव पाठीशी खंबीर असणारे नेतृत्व- आमदार मानसिंगराव नाईक=सदाजी पाटील (उपसरपंच आरळा)
=====================================================================
कार्यकर्त्यांची कदर असणारे नेतृत्व - आमदार मानसिंगराव नाईक =सुनिता निकम बांधकाम सभापती शिराळा नगरपंचायत
========================================================================
========================================================================
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------

0 Comments