BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

भुताचा उताराच त्या युवकांनी पळवला अन्-



अंधश्रधेपोटी उतारा करून ठेवलेल्या नारळ व लिंबूंचा शिराळ्यातील तीन युवकांकडून फस्त करण्यात आला.येथील तीन युवकांनी अंध श्रद्धेपोटी भुता केताला ठेवलेला उतारा सकाळी व्यायामाला जाताना निदर्शनास आल्यावर हडप करुन भुतानांच आव्हान देण्याचे काम केले आहे.


      ओकांर आडके, अजिंक्य आडके व संकेत कबुरे या तीन युवकानीं अंध श्रद्धेपोटी उतरून ठेवलेल्या तीन नारळ व ५ लिंबू या उतार्‍याचा घरी येऊन लिंबू सरबत केला. नारळ फोडून त्यातील पाणी पिले. त्यातील खोबरे स्वयंपाकात वापरले अशा प्रकारे नारळ लिंबुचा आस्वाद घेवून शेकडो वर्षाच्या अंधश्रध्देला आव्हान देत मुठमाती दिली आहे. त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

        हे तीन युवक नेहमी प्रमाणे आज सकाळी व्यायामासाठी जुना सागाव रोड व बिऊरच्या दिशेने मोरणा नदीकडे गेले होते. यावेळी नदीच्या पुलावर भुतासाठी उतरून ठेवलेले लिंबू, नारळ त्यांना दिसले. त्यांनी ते घरी आणून खोबरे खावून लिंबू सरबताचा आस्वाद घेतला. याबाबत त्यांची भेट घेतली असता ते म्हणाले, लिंबू पाचक असून यात 'क' जीवनसत्व आहे. नारळपाणी बहुपयोगी व पौष्टिक आहे. 


      आज देशापुढे कुपोषण व उपासमारीचा मोठा ज्वलंत प्रश्न असताना सर्वत्र वाहनांना लिंबू व मिरची बांधणे, नवीन वहानांची पुजा करताना चाका खाली लिंबू ठेवणे, जेथे तिन रस्ते मिळतात तेथे नैवेद्य ठेवला जातो. यामुळे अन्नाची नासाडी होते, पैसा वाया जातो. घरी फोडणीला तेल नसले तरी देवा साठी तेलाचा अभिषेक घातला जातो. हे चुकीचे असून यातून अंध श्रद्धेला खत पाणी मिळते

        हे तिन्ही युवक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत प्रा. विजयकुमार जोखे यांचे नातू आहेत. जोखे सर हे देखील दररोज सकाळी सायकलींग करत असताना पिशवी सोबत घेऊन जातात. अमावस्या, पौर्णिमेला लिंबू, नारळ ते घरी आणतात. गेली २५ वर्षे हा उपक्रम सुरू असून या काळात एकाही भुताने त्यांचे काहीच बिघडवलं नाही. भुताचे अस्तित्व सिध्द करणाऱ्याला १५ लाखांचे बक्षीस महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ठेवले आहे. विवेकाचा आधार घ्या. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा. भूत, हडळ, मुजांबां याचे अस्तित्वच नाही असा संदेश या तीन युवकानीं कृतीतून दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

          यावेळी प्रेस क्लब ऑफ शिराळा यांच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत विजयकुमार जोखे यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाले बद्दल व त्या तीन युवकांचा देखील सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रेस क्लब ऑफ शिराळा चे अध्यक्ष विनायक गायकवाड, कार्याध्यक्ष दिनेश हसबनीस, उपाध्यक्ष विकास शहा, अजित महाजन उपस्थित होते.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोंडाईवाडीच्या रानफुलांची भुरळ

=======================================================================

भुताचा उताराच त्या युवकांनी पळवला अन्-

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

चिखली येथे  २०० हून अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान

=====================================================================

ऐतवडेत ओढ्यावर श्रमदानातून वनराई बंधारा

---------------------------------------------------------------------------------------

विशेषवृत्त-लॉकडाऊनच्या काळात महिला बचत गटांनी मास्क विक्रीतून 20 लाखांची केली कमाई 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोरोना योद्धा आमदार मानसिंगराव नाईक वाढदिवस विशेष

इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-===========================================================================
========================================================================
=====================================================================
========================================================================
========================================================================
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------

Post a Comment

0 Comments