BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

केंद्र सरकारच्या कार्याची माहिती घरोघरी पोहचवा-माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक


शिराळा: शहरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे सहीच्या पत्राचे  वितरण माजी आमदार शिवाजीराव नाईक यांचे हस्ते करण्यात आले .यावेळी सुखदेव पाटील, रणजितसिंह नाईक, रघुनाथ पाटील,सम्राट शिंदे

शिराळा,ता.२३: बूथ प्रमुख व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या २.० प्रथम वर्षपूर्ती व  केंद्र सरकारच्या कार्याची माहिती देणारे पत्रक सोशल डिस्टनसिंग पाळून घरोघरी जाऊन तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम करावे असे आव्हान  माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी केले.शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये  शिराळा शहरासह  ग्रामीण भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे सहीच्या पत्राचे  वितरण शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

     यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सुखदेव पाटील म्हणाले,गेल्या वर्षभरामध्ये आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी सतत नवी स्वप्ने व  नविन संकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. "सबका साथ!सबका विकास!सबका  विश्वास "! हा मंत्र घेऊन आज देशाची सामाजिक आर्थिक घडी बसवण्याचे काम मोदी सरकारने केले आहे.त्यांच्या कार्याचा गौरव  सर्वच स्तरातून केला जात आहे.

         यावेळी शिराळा युवा नेते रणजितसिंह नाईक, जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष रघुनाथ पाटील, सम्राट शिंदे (सरकार), नगरसेवक बंडा डांगे, सचिन यादव, प्रदीप कदम,वैभव गायकवाड, बिऊर उपसरपंच राजू पाटील , उत्तम पाटील ,प्रतीक बागणिकर, अधिक चरापले, संतोष गायकवाड,विक्रम पाटील मान्यवर उपस्थित होते.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर

=====================================================================

निगडी येथे दोन कोरोना पॉझिटीव्ह तर तालुक्यातील 7 कोरोना मुक्त 22.6.20

========================================================================

वाचा- कहाणी स्मशानातल्या वाढदिवसाची

========================================================================

आनंदाची बातमी-शिराळच्या  कोविड उपजिल्हा रुग्णालयातून उपचार घेणारे तीन  रुग्ण कोरोना मुक्त

===============================================

=====================================================================

मांगले- सावर्डे बंधारा दुरुस्ती लवकरच-  जलसंपदामंत्री जयंत पाटील

=======================================================================

मोलमजुरी करणाऱ्यांंचा मुलगा 

व -भाजीविक्रेत्या आज्जीचा नातू बनला पोलीस  उपाधिक्षक

=====================================================================

घागरेवाडीत जनावरांच्या शेडमध्ये घुसला बिबट्या

========================================================================

Post a Comment

0 Comments