शिराळा,ता.१९: शिराळा तालुक्यातील मणदूर येथील चार तर निगडी येथे मुंबईहून आलेल्या ३२वर्षीय युवतीचा असा एकूण पाच जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे निगडी गावात पुन्हा एक वेळ कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
आज मणदूर येथील चार जण कोरोना मुक्त झाले आहेत.
----------------------------------------------------------------------------------------
सविस्तर बातमी वाचा थोड्या वेळात
-------------------------------------------------------------------------------------
सागाव: शिराळा आगाराने सागाव येथील श्री शिवाजी कृषि सेवा केंद्र येथे ९ टन खतांची मालवाहतूक करून तालुक्यात सुरू केलेल्या पहिल्या माल वाहतूक सेवेच्या शुभारंभ प्रसंगी
सभापती सौ. वैशाली माने,सरपंच वसंत पाटील,उपसरपंच सत्यजित पाटील ,सुखदेव माने, शिवाजी माने, शिराळा आगार व्यवस्थापक सौ विद्या कदम, स्थानक प्रमुख सौ. धन्वंतरी ताटे,सहायक वाहतूक नियंत्रक मिलिंद कुंभार , वाहतूक नियंत्रक संभाजी नलवडे, सतीश सुतार, रवी निकम, आण्णासो जाधव, सचिन माने
शिराळा आगाराच्या मालवाहतूक सेवेस प्रारंभ
शिराळा, ता.१९: एस टी महामंडळाच्या नवीन उपक्रमानुसार शिराळा आगाराने पहिली मालवाहतूक सागाव येथे करून माल वाहतुकीचा शुभारंभ केला.
एस.टी.महामंडळाने मालवाहतूक साठी एस.टी. सुरू केली आहे. त्यानुसार आज सागाव येथील श्री शिवाजी कृषि सेवा केंद्र येथे ९ टन खतांची मालवाहतूक करून तालुक्यातील माल वाहतूक सेवेचा प्रारंभ केला.
हे खत सांगली रेल्वे स्टेशन येथून सागाव येथे आणण्यात आले..
या तालुक्यातील पहिल्या मालवाहतूक सेवेचे पूजन शिराळा पंचायत समितीच्या सभापती सौ. वैशाली माने,सरपंच वसंत पाटील,उपसरपंच सत्यजित पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी सुखदेव माने, शिवाजी माने, शिराळा आगार व्यवस्थापक सौ विद्या कदम, स्थानक प्रमुख सौ. धन्वंतरी ताटे,सहायक वाहतूक नियंत्रक मिलिंद कुंभार , वाहतूक नियंत्रक संभाजी नलवडे, सतीश सुतार, रवी निकम, आण्णासो जाधव, सचिन माने उपस्थित होते.
यावेळी सर्व उपस्थितांचे सुखदेव माने यांनी पुष्पगुछ देऊन स्वागत केले. या पुढे मालवाहतुकीसाठी सहकार्य करण्याची त्यांनी ग्वाही दिली. तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या मालाच्या वाहतुकीसाठी शिराळा आगाराशी संपर्क साधावा असे अवाहन केले आहे.
@ इतर महत्वाच्या बातम्या @
0 Comments