BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

राजू शेट्टी यांनीच विधानपरिषदेचे प्रतिनिधित्व करावे..!


राजू शेट्टी यांनीच विधानपरिषदेचे प्रतिनिधित्व करावे..!


स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची  मागणी.

शिराळा:राजू शेट्टी फोटो वापरा
शिराळा, ता.१६:गेली २५ वर्षे अविरतपणे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चळवळीच्या माध्यमातून झटणारे नेतृत्व म्हणून  माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडे पाहिलं जातं.  या पुढे ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी विधान परिषदेचे सदसत्च स्वीकारावे अशी मागणी कार्यकर्त्यांची असल्याने मत स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडी जिल्हाध्यक्ष साईनाथ पाटील यांनी व्यक्त केले.
 यावेळी पाटील म्हणाले, शेट्टी यांनी देशभरातील अनेक शेतकरी संघटना एकत्र करून देशपातळीवर शेतकऱ्यांची मोट बांधली आहे. त्या सर्व संघटनांचे नेतृत्व करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना देशपातळीवर तोंड फोडले आहे. त्यांच्यासाठी विधापरिषदेचा प्रस्तावा ठेवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने  सांगली जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते, शेतकरी, पदाधिकारी यांचा ही  शेट्टींनी हा प्रस्ताव स्वीकारावी असा आग्रह आहे. कार्यकर्ते, शेतकरी,पदाधिकारी यांनी आपल्या भावना त्यांना दूरध्वनीवरून कळवल्या आहेत.. तरी तमाम शेतकरी बांधवांच्या भावना लक्षात घेवून त्यांनी हे सदसत्व स्वीकारावे अशी आग्रहाची मागणी आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेट्टी यांच्यासारख्या अभ्यासू, आक्रमक नेत्याची गरज आहे. एक वेळ विधानसभा, दोन वेळा लोकसभेत काम करण्याचा अनुभव व  शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सखोल माहिती आहे. त्यामुळे विधान परिषदेचे सदसत्च स्वीकारल्यास त्यांच्या अनुभवाचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना व महाविकास आघाडीला पण होईल.
यावेळी संघटनेचे  राम पाटील, धैर्यशील पाटील, देवेंद्र धस, अक्षय पंडित, शैलेश पाटील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments