BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

तालुक्यात दोन कोरोना पॉझिटिव्ह तर दोन कोरोना मुक्त


तालुक्यात दोन कोरोना पॉझिटिव्ह तर दोन कोरोना मुक्त

मणदूर :येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने घरोघरी सॅनिटाइझर व टी. सी.एल.चे वाटप ग्रामपंचायतचा वतीने करण्यात आले.
शिराळा, ता.१२:  शिराळा तालुक्यातील मणदूर १,रिळे १ आशा  जणांनचा  कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  अतिदक्षता विभागात उपचार सुरू असणाऱ्या मणदूर येथील ८१ व खिरवडे येथील ५६वर्षीय वृद्ध कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे या दोन्ही गावाला दिलासा मिळाला आहे.
मणदूर येथील रुग्णांची संख्या ३१ झाली आहे. शिराळा तालुक्यातील रुग्णाची संख्या ५९तर पश्चिम भागातील रुग्णांची संख्या ४७ झाली आहे.आज मणदूर येथील १६,वर्षीय युवती तर  रिळे येथील १३ वर्षीय युवक पॉझिटिव्ह आला आहे.  तो युवक मुंबईहून आलेल्या ४१ वर्षीय कोरोना बाधित महिलेच्या संपर्कातील आहे.
मणदूर येथे कोरोना रुग्णांची वाढ होत असल्याने त्यांच्या संपर्कातील  ५७ लोकांना वारणावती व सोनवडे येथील हायस्कूल मध्ये क्वारंटाईन केले आहे. मणदूर येथील ४१ जणांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आज ग्रामपंचायतच्यावतीने घरोघरी सॅनिटाइझर व टी. सी.एल. वाटप करण्यात आले.यावेळी सरपंच वसंत पाटील,उपसरपंच विजय चौगुले, ग्रामसेवक एम.एन.पाटील,तलाठी भास्कर पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
 खिरवडे व मणदूर येथील रूग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असले तरी ते आज कोरोना मुक्त झाले आहेत.
शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात सहा जणांच्यावर उपचार सुरू आहेत.


Post a Comment

0 Comments