BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा तालुक्यातील आणखी चौघांना कोरोनाची लागण


शिराळा तालुक्यातील आणखी चौघांना कोरोनाची लागण


शिराळा,ता.५: शिराळा तालुक्यता आज आणखी चौघांना कोरोनाची लागण झाली असून यात  रिळे येथील तिघांचा व माळेवाडी येथील एकाचा समावेश आहे.
   रिळे येथील ७० वर्षीय पुरुष, ५७ वर्षे पुरुष व ५३ वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते रिळे येथील मुंबईहून आलेल्या कोरोन बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहेत. माळेवाडी येथील मुंबईहून आलेल्या ५८ वर्षाच्या पुरुषास कोरोनाची लागण झाली आहे.
खिरवडे येथील ५६वर्षीय व मणदूर येथील ८१ वर्षीय वृद्धावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
तालुक्यात एकूण २६ रुग्ण त्या पैकी पश्चिम भागात १८ रुग्ण
गाव निहाय संख्या अशी
 निगडी ४ , रेड ३ , अंत्री खुर्द १ , मोहरे २ , खिरवडे २, करुंगली १ , चिंचोली १ , मणदूर ६, काळोखेवाडी १, रिळे ४,माळेवाडी १ असे  एकूण २६ रुग्ण झाले आहेत.
त्या पैकी निगडी २,रेड २, मोहरे १, करुंगली १ असे सहा कोरोना मुक्त झाले आहेत. तर मोहरे येथील एकाचा मृत्यू झाला आहे.

Post a Comment

0 Comments