BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मणदूर येथे चौघांना तर मांगलेच्या एकास कोरोनाची लागण.

मणदूर: येथे रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने उपजिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी भेट देऊन माहिती घेतली

मणदूर येथे चौघांना तर मांगलेच्या एकास कोरोनाची लागण.

शिराळा, ता.१०: शिराळा तालुक्यातील मांगले येथील डॉक्टरच्या संपर्कातील त्यांच्या  ११ वर्षीय पुतण्याचा व मणदूर येथील चौघांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शिराळा तालुक्यात आज पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शिराळा तालुक्याची अर्धशतकाकडे वाटचाल झाली आहे.
त्यामुळे मांगले येथे ३ तर मणदूर येथे २४ रुग्ण झाले आहेत.  त्यामुळे शिराळा तालुक्यातील रुग्णाची संख्या ४९ तर पश्चिम भागातील रुग्णांची संख्या ३८ झाली आहे.
मांगले येथील खासगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली होती.त्यामुळे त्यांच्या संपर्कातील त्यांचा भाऊ व पुतण्या यांना ही कोरोनाची लागण झाली आहे. तर मणदूर येथील १७ वर्षीय युवक, १६ वर्षीय युवती, ३८ व ४० वर्षीय युवक अशा एकूण चार जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
किनरेवाडी, खिरवडे, मणदूर येथील रुग्णावर अतिदक्षता विभागता उपचार सुरू आहेत.

उपजिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची भेट

 उपजिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सांगाव , मांगले , मणदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राना भेट दिली. यावेळी त्यांनी कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील सर्व नागरिकांची माहिती घ्या ,जास्तीत जास्त नागरिकांचे घश्यातील स्त्रावाचे नमुने घ्या , ५० वर्षावरील सर्व नागरिकांची दररोज आरोग्य तपासणी करा , कंटेन्मेंट झोन ची कडक अंमलबजावणी करा अश्या सूचना दिल्या.
यावेळी प्रांताधिकारी नागेश पाटील,तहसीलदार गणेश शिंदे,गटविकास अधिकारी डॉ.अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments