BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मणदूर एक रुग्ण पॉझिटिव्ह

मणदूर:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक मारुती पाटील यांनी आपल्या वास्तुशांतीच्या खर्चाला फाटा देऊन मणदूर येथील साडेचारशे कुटुंबियांना खाद्यतेलाचे वाटप केले.  यावेळी सरपंच वसंत पाटील,उपसरपंच विजय चौगुले, ग्रामसेवक एम.एन.पाटील,तलाठी भास्कर पाटील

वाचा महत्वाची बातमी

पूराच्या अनुषंगाने महाराष्ट्र - कर्नाटक मध्ये समन्वय ठेवणार-जलसंपदा मंत्री जयंत पाटील


मणदूर एक रुग्ण पॉझिटिव्ह

शिराळा,ता.२०: शिराळा तालुक्यातील मणदूर येथील  १० वर्षाच्या मुलीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मणदूर १८ वर्षाचा व किनरेवाडी  ३५ वर्षाचा युवक असे दोन जण कोरोना मुक्त झाले आहेत. तालुक्याची वाटचाल शतकाकडे सुरू आहे.तालुक्यातील रुग्णाची संख्या ९६ तर पश्चिम भागातील रुग्णांची संख्या ७७ झाली आहे. आज अखेर तालुक्यातील १९ गावे कोरोना बाधित झाली आहेत.

४५० कुटुंबियांना खाद्यतेल वाटप

येथील मारुती पाटील व सौ.पाटील या शिक्षक दाम्पत्याने वस्तूशांतीच्या खर्चाला फाटा देऊन मणदूर गावातील ४५० कुटुंबांना खाद्यतेलाच्या पिशवीचे वाटप केले.

उद्या रविवारी पालकमंत्री भेट

शिराळा तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने पालकमंत्री जयंतराव पाटील मणदूर येथे भेट देणार आहेत.

तालुक्यात निगडी ५ , रेड ३ , अंत्री खुर्द १ , मोहरे २ , खिरवडे २, करुंगली १ , चिंचोली १ , मणदूर ५६ काळोखेवाडी २, रिळे ६,माळेवाडी२,मांगले ३ ,किनरेवाडी ४, लादेवाडी १,खेड २,पणुंब्रे तर्फ शिराळा १,पुनवत १,बिळाशी १ ,शिराळा २असे आज अखेर एकूण ९६ रुग्ण झाले आहेत. 

 निगडी ३,रेड३,चिंचोली १,करुंगली १, मोहरे १,मणदूर २०, खिरवडे २,रिळे ३,माळेवाडी १, काळोखेवाडी २,मांगले ३,,किनरेवाडी १असे ४१ कोरोना मुक्त झाले आहेत.

  1. तालुक्यातील एकूण रुग्ण ९६
  2. कोरोना मुक्त ४१
  3. कोरोनामुळे मृत २
  4. अतिदक्षता विभागात १

----------------------------------------------------------------------------------------

@ वाचा इतर महत्वाच्या बातम्या @

 मोलमजुरी करणाऱ्यांंचा मुलगा व -भाजीविक्रेत्या आज्जीचा नातू बनला पोलीस  उपाधिक्षक

----------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------

घागरेवाडीत जनावरांच्या शेडमध्ये घुसला बिबट्या

----------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments