मणदूर येथे कोरोनाचा बळी; नवीन १३ रुग्ण
शिराळा, ता.७: मणदूर (ता.शिराळा ) येथे १३ व काळोखेवाडी २० वर्षीय युवक अशा एकूण १४ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्या पैकी ८० वर्षीय कोरोना बाधित वृद्धाचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे शिराळा तालुक्यातील कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे.शिराळा तालुक्यातील पश्चिम भागातील बहुतांशी लोक हे मुंबईत आहेत.मुंबईत कोरोनचा फैलाव वाढू लागल्याने अनेकांनी गावची वाट धरली. त्या माध्यमातून तालुक्यता कोरोनचा संसर्ग वाढू लागला आहे.
मणदूर येथील त्या वृद्धास शुक्रवारी त्रास जाणवू लागल्याने मिरज येथे पाठवण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. इतर १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. काळोखेवाडी येथील त्या महिलेच्या संपर्कातील २८ वर्षाच्या युवकास कोरोनाची लागण झाली आहे. मणदूर येथील २१ वर्षाचा युवक कोरोना मुक्त झाला आहे.
0 Comments