BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मणदूर येथे १०,किनरेवाडी १ कोरोना पॉझिटिव्ह

मणदूर येथे १०,किनरेवाडी १ कोरोना पॉझिटिव्ह

शिराळा, ता.१४: शिराळा तालुक्यातील मणदूर १० तर किनरेवाडीत १  अशा ११ जणांनचा  कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून तालुक्यातील रुग्णाची संख्या ७९ तर पश्चिम भागातील रुग्णांची संख्या ६४ झाली आहे. चार जण कोरोना मुक्त झाले आहेत.
           मणदूर येथील रुग्ण कोरोना बधितांच्या संपर्कातील ११,३८,२५,३५ वर्षीय युवक, १५,२३,२५ वर्षीय युवती, ४५ वर्षीय दोन,५० वर्षीय महिला असे एकूण १०जणांचे  तर किनारेवाडी येथील  ७५ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. किनरेवाडी येथील महिला आपल्या कुटुंबातील लोकांच्या समवेत मुंबईहून येऊन घरी क्वारंटाईन होती. तिचा  १४ दिवसाचा क्वारंटाईन कालावधी चार दिवसांपूर्वीच संपला आहे. पण ५० वर्षापुढील लोकांचे स्वॅब घेतले जात आहेत. त्या नुसार त्या महिलेचा स्वॅब घेतला असता आज पॉझिटिव्ह आला.
रिळे येथील ५७ वर्षीय पुरुष व माळेवाडी येथील ५८ वर्षीय पुरुष,मणदूर येथील ७५ वर्षीय महिला व काळोखेवाडी येथील ४० वर्षीय महिला असे आज चार जण कोरोना मुक्त झाले आहेत.
         मणदूर येथे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढू लागल्याने व पावसाळा सुरू झाल्याने प्रशासनाच्यावतीने  आरोग्य कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप तहसीलदार गणेश शिंदे,गट विकास अधिकारी डॉ.अनिल बागल, सरपंच वसंत पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
        यावेळी  वैद्यकीय अधिकारी डॉ.मनजीत परब, डॉ.नंदकुमार गवारी, आरोग्य निरीक्षक विजय जाधव,आरोग्य सेवक एस.एल.बनसोडे, आरोग्य सहायीका ए.एस.मस्कर, एस.एस.पाटील, जे.एस.चौगुले,,आशा गटप्रवर्तक शोभा पाटील, विशाल पाटील पाटील,उपसरपंच विजय चौगुले, ग्रामसेवक एम.एन.पाटील,तलाठी भास्कर पाटील,हणमंत पाटील,यांच्यासह आशा स्वयंसेवीका,अंगणवाडी सेविका
 उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments