विमानातून आणल्या गेलेल्या रोगाने बैलगाडीतल्या माणसाला गिळंकृत केले-प्रा.डॉ. विजयालक्ष्मी नियोगी
शिराळा - विमानातून आणल्या गेलेल्या रोगाने बैलगाडीतल्या माणसाला गिळंकृत केल आहे. कोरोनाच्या महामारीतून माणुस वाचवूया. राज्य सरकारने ग्रामपातळीवर विविध समित्याद्वारे उपाय योजना कराव्यात असे प्रतिपादन प्रा.डॉ. विजयालक्ष्मी नियोगी यांनी केले. विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य. , श्रमिक मुक्तीदल लोकशाहीवादी, सर्व पुरोगामी संघटनां आणि शिराळा तालुका कामगार परिषद आयोजीत रक्तदान शिबीराच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. जेष्ठ विचारवंत कॉ. धनाजी गुरव, प्रा. विजयकुमार जोखे, सेवानिवृत्त माहिती अधिकारी हंबीरराव देशमुख, शिराळा प्रेस क्लबचे अध्यक्ष विनायकराव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. नगराध्यक्षा सौ. अर्चना शेटे, नगरसेविका प्रतिभाताई पवार यांचेहस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.प्रा.डॉ. नियोगी म्हणाल्या, कोरोना विरोधी लढ्यात सामान्य माणसांनी कार्यकर्ता पातळीवर माणूस जगविण्यासाठी सरकारी मदतीची वाट न पाहता सढळ हाताने मदत केली. गतवेळीच्या महापुराच्या संकटकाळात देखिल प्रत्येकाने पुर्ण ताकदीने मदतकार्य केले. संकटकाळात माणूस वाचविण्यासाठी मदतकार्य करणे हे माणुसपणाचे लक्षण आहे. शिराळा येथील हे रक्तदान शिबीराचा उपक्रम याच सृजनशीलतेचा भाग असल्याचे मत डॉ. नियोगी यांनी व्यक्त केले.
या रक्तदान शिबीरात शिराळा शहर परिसरातील 25 रक्तदात्यांनी रक्तदान करून कोरोना विरोधी लढ्यात योगदान दिले. यावेळी शिराळा पोलीस ठाण्याचे कर्तव्यावरील पोलीस कर्मचारी पो.हे.कॉ. महादेव पाटील यांनी रक्तदान करून शिबीराचा शुभारंभ केला. या शिबीरास जेष्ठ पत्रकार दिनेश हसबनीस, डॉ शिवाजीराव चौगुले, संपादक नवनाथ पाटील, प्रितम निकम, मनोज मस्के, गजानन पाटील, दिपक हिवराळे यांनी सदिच्छा भेट देऊन रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या. कॉ. दिग्विजय पाटील यांनी रक्तदात्यांना ग्लुकोज बिस्कीट वाटप केले. *राजारामबापू रक्तपेढी इस्लामपूरच्या डॉ. आशा खडके आणि त्यांच्या वैद्यकीय स्टाफने रक्तसंकलन केले. यावेळी शिबीरस्थळाचे सँनिटायझेशन करण्यात आले. सोशल डिस्टींक्शन च्या सर्व सरकारी नियमांचे पालन करण्यात आले. सर्व उपस्थित मान्यवर व रक्तदात्यांनी मास्क वापरले होते.
प्रा. मिलींद साळवे यांनी आभार मानले तर संपादक दत्तात्रय पाटील यांनी सुत्रसंचालन केले. कामगार नेते मारूती रोकडे, डॉ. सुनिल पाटील, प्रियांका शिंदे यांचेसह सामाजिक कार्यकर्ते अमोल साठे, स्वाती भस्मे, अरूण केसरकर, संदिप कांबळे, गजानन पवार यांनी व्यवस्थापन केले.
0 Comments