किनरेवाडी: येथे घरोघरी सर्व्हे करताना आरोग्य कर्मचारी
किनरेवाडीत दोन तर मणदूरला एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह
शिराळा, ता.१७: शिराळा तालुक्यातील किनरेवाडीत २ मणदूर १ असे तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. मांगले येथील तीन व मणदूर येथील १० असे एकूण १३जण आज कोरोना मुक्त झाले आहेत.तालुक्यातील रुग्णाची संख्या ९० तर पश्चिम भागातील रुग्णांची संख्या ७२ झाली आहे. आज अखेर तालुक्यातील १९ गावे कोरोना बाधित झाली आहेत.
किनरेवाडी येथील ७५ वर्षीय महिला आपल्या कुटुंबातील लोकांच्या समवेत मुंबईहून येऊन घरी क्वारंटाईन होती. तिचा १४ दिवसाचा क्वारंटाईन कालावधी संपला होता.मात्र ५० वर्षापुढील लोकांचे स्वॅब घेतले जात होते .त्या नुसार त्या महिलेचा स्वॅब घेतला असता ती महिला १४ जूनला पॉझिटिव्ह आली होती.त्यामुळे तिच्या संपर्कातील १५ लोकांना शिराळा येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. त्या पैकी आठ जणांचे अहवाल आले असून ३२ वर्षीय युवती व ३५ वर्षीय युवक यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून उर्वरित सहाजण निगेटिव्ह आले आहेत. अद्याप सात जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. मणदूर येथील ७० वर्षीय महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
मांगले येथील ५३,४८,पुरुष व ११ वर्षाचा युवक असे तीन व मणदूर ३०,५०,६२,४० पुरुष तर १२ व ४ वर्षाची मुले, ६०,७२ व ४५ वर्षे दोन महिला असे १० तालुक्यातील एकूण १३जण आज कोरोना मुक्त झाले आहेत.
तालुक्यात निगडी ४ , रेड ३ , अंत्री खुर्द १ , मोहरे २ , खिरवडे २, करुंगली १ , चिंचोली १ , मणदूर ५१ काळोखेवाडी २, रिळे ६,माळेवाडी२,मांगले ३ ,किनरेवाडी ४, लादेवाडी १,खेड २,पणुंब्रे तर्फ शिराळा १,पुनवत १,बिळाशी १ ,शिराळा २असे एकूण ९०रुग्ण झाले आहेत.
निगडी ३,रेड३,चिंचोली १,करुंगली १, मोहरे १,मणदूर १५, खिरवडे २,रिळे ३,माळेवाडी १, काळोखेवाडी २,मांगले ३असे ३५ कोरोना मुक्त झाले आहेत.
तालुक्यातील एकूण रुग्ण ९०
कोरोना मुक्त ३५
कोरोनामुळे मृत २
1 Comments
Mast news pepar
ReplyDelete