मांगलेत दोघा भावांना तर मणदूर येथे महिलेस कोरोनाची लागण
शिराळा, ता.८: मांगले (ता.शिराळा) येथील एका खाजगी डॉक्टरसह त्यांच्या भावाचा व मणदूर येथील मृत्यू पावलेल्या कोरोना बाधित रुग्णाच्या ७२ वर्षीय पत्नीचा
कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. मांगलेच्या डॉक्टरमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
शिराळा तालुक्यता दिवसेंदिवस कोरोना रुग्णांनच्या संख्येत वाढ होत आहे. तालुक्यातील रुग्णांची संख्या ४३ झाली आहे.
शनिवारी कोरोना बाधित ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. त्यांच्या संपर्कातील त्यांची पत्नी यांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याने मणदूर येथील कोरोना बधितांची संख्या २० झाली आहे.
मांगले येथील कोरोनाबाधित डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक, मित्र, रुग्ण यांचा शोध सुरू आहे. डॉक्टर यांच्यावर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यांचा स्वॉब घेतला असता अहवाल पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांची, पत्नी व पुतणी यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज त्यांच्या भावजय, पुतण्या यांचे स्वॉब घेण्यात आले आहेत. मुख्य बाजार पेठेत संपूर्ण गाव बंद केले आहे.
तहसिलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, सरपंच मीनाताई बेंद्रे, उपसरपंच धनाजी नरूटे, तलाठी सुभाष बगडी, ग्रामविस्तार अधिकारी, एन. ए. कारंडे यांनी भेट दिली.
0 Comments