शिराळा तालुक्यात तीन कोरोना पॉझिटिव्ह
शिराळा, ता.१५: शिराळा तालुक्यातील खेड १, बिळाशी १,मणदूर येथील पाच महिन्याच्या बाळाचा १ अशा तीघांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील रुग्णाची संख्या ८२तर पश्चिम भागातील रुग्णांची संख्या ६६झाली आहे. आज अखेर तालुक्यातील १८ गावे कोरोना बाधित झाली आहेत.बिळाशी येथील ६० वर्षीय वृद्ध ११ जून रोजी आपल्या कुटुंबा समवेत मुंवईहून आले होते.शाळेत क्वारंटाईन झाले होते. ५० वर्षा पुढील लोकांचे स्वॅब घेतले जात असल्याने त्यांचा ही स्वॅब घेतला होता. त्यांना कोणताही त्रास जाणवत नाही पण त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
खेड येथील कोरोना बाधित असलेल्या ४४ वर्षीय युवकाच्या १२ वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते ६ जून रोजीमुंबईहून येऊन घरीच क्वारंटाईन झाले होते. मणदूर येथील पाच महिन्याच्या बाळाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
तालुक्यात निगडी ४ , रेड ३ , अंत्री खुर्द १ , मोहरे २ , खिरवडे २, करुंगली १ , चिंचोली १ , मणदूर ४७ काळोखेवाडी २, रिळे ६,माळेवाडी२,मांगले ३ ,किनरेवाडी २, लादेवाडी १,खेड २,पणुंब्रे तर्फ शिराळा १,पुनवत १,बिळाशी १ असे एकूण ८२ रुग्ण झाले आहेत.
निगडी ३,रेड३,चिंचोली १,करुंगली १, मोहरे १,मणदूर ५, खिरवडे २,रिळे २,माळेवाडी १, काळोखेवाडी १असे २० कोरोना मुक्त झाले आहेत.
तालुक्यातील एकूण रुग्ण ८२
कोरोना मुक्त २०
कोरोनामुळे मृत २
1 Comments
So sad
ReplyDelete