शिराळा तालुक्यातील तिघे कोरोना मुक्त
शिराळा, ता.६: शिराळा तालुक्यातील तीन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने तालुक्यातील २६पैकी ९ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.त्यामुळे आज रेड,निगडी व चिंचोली या गावांना दिलासा मिळाला आहे.निगडी येथील ३० वर्षीय पुरुष व २४ वर्षीय महिला हे पति-पत्नी १४ मे रोजी मुंबईहून आले होते. तथापि या दोघांना निगडी गावातील लोकांनी गावात न घेतल्याने ते जांभूळवाडी येथील कम्युनिटी क्वारंटाईनमध्ये राहत होते. या दोघांनाही कोरोनाची लागण झाली होती.त्यापैकी आज सादर महिलेचा पती कोरोना मुक्त झाला आहे. निगडित चार कोरोना बाधित होते. त्या पैकी तीन कोरोना मुक्त झाले आहेत.
चिंचोली येथील ४३वर्षीय युवक २२मे रोजी मुंबईहून येऊन घरी क्वारंटाईन झाला होता . त्यास मंगळवारी २६ मे रोजी त्रास जाणवू लागल्याने मिरज येथे पाठवण्यात आले होते. बुधवारी (ता.२७) रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.तो युवक आज कोरोना मुक्त झाला आहे.
मुंबईहून आलेल्या रेड येथील पती पत्नीला कोरोनाची लागण झाली होती.त्यांच्या संपर्कात असलेल्या त्यांच्या २० वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाली होती. तो युवक आज कोरोना मुक्त झाला आहे. चार दिवसांपूर्वी त्याचे आई वडील ही कोरोना मुक्त झाले आहेत. रेड येथील कुटुंब कोरोना मुक्त झाल्याने गावाला दिलासा मिळाला आहे.
कोरोना मुक्त झालेले गाव व रुग्ण संख्या
निगडी ३, रेड ३, मोहरे १,करुंगली१,चिंचोली १ तर मोहरे येथील एक रुग्ण मृत झाला आहे.
0 Comments