BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

तर साहेब तुम्हीच सांगा आम्ही जगायचं कसं -व्यथा कोरोनाग्रस्त गावाची

मणदूर:येथे कोरोनच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे आपली व्यथा मंडताना मणदूर ग्रामस्थ

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------ब्रेकिंग न्यूज---------------------

ही बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर  क्लिक करा

-आनंदाची बातमी-शिराळच्या  कोविड उपजिल्हा रुग्णालयातून उपचार घेणारे तीन  रुग्ण कोरोना मुक्त

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

                         ब्रेकिंग न्यूज- 

ब्रेकींग न्युज-  बातमीसाठी खालील होडींगवर क्लिक करा

निगडी येथे दोन कोरोना पॉझिटीव्ह तर तालुक्यातील 7 कोरोना मुक्त 22.6.20

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

-शिराळा: साहेब ,जनावरांना चारा नाही, दुधाला गिऱ्हाईक नाही,कसायला जमीन नाही, आता आहे ती नोकरी गेली तर आम्ही जगायचं कसं अशा विविध समाश्यांचा पाढा  पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे मणदूर ग्रामस्थांनी वाचला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मणदूर येथे पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी आज शिराळा तालुक्यातील मणदूर येथे कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात सर्वाधिक असल्याने कोरोनच्या पार्श्वभूमीवर या गावात करण्यात आलेल्या विविध उपाय योजनांचा आढावा घेतला

खालील लिंकवर क्लिक करून बातमी वाचा

महत्वाची बातमी-----शिराळा व कोकरूड येथे अतिदक्षता विभाग सुरू करा-  पालकमंत्री जयंतराव पाटील

यावेळी गावातील ३५ लोक मुबई येथे नोकरीसाठी आहेत. त्यांना कामावर हजर रहाण्याच्या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत.वेळेत कामावर येणार नसाल तर राजीनामा द्या असे कळवले आहे. मणदूर हे कंटेंमेंट झोन मध्ये असल्याने आम्हाला बाहेर जाण्यासाठी मनाई असल्याने मेडिकल सर्टिफिकेट मिळत नाही. काही जमीन धरणात गेली ऊरलेली जमीन शिक्षण व नोकरीसाठी विकली.आता आम्हाला नोकरीचाच आधार आहे. गेलो नाही तर  कामावरून काढून टाकतील.मग आम्ही जगायचे कसे.
         तीन महिने झाले मुंबईहून आलो आहे. मुंबईचे केशरी रेशन कार्ड असल्याने  आम्हाला येथे धान्य मिळत नाही.भात पेरणी झाली पण ६० टक्के उगवण झाली. पावसामुळे अनेक ठिकाणी बांध फुटू होऊन नुकसान झाले आहे.रानात व शेतात चारा आहे पण पण तीन आठवडे घराबाहेर जात येत नाही. त्यामुळे पावसाळ्यासाठी ठेवलेल्या सुक्या चाऱ्यावर जनावरे आहेत. आता त्याचा ही तुटवडा भासत आहे.

वाचा- बंदिस्त बिबट्याने ठोकली  जंगलात धुम 

          दूध संकलन व रोजगार बंद असल्याने आर्थिक चणचण मोठ्या प्रमाणात भेसावत असल्याची व्यथा ग्रामस्थांनी पालकमंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांच्या समोर मांडली.
        यावेळी मुंबईला नोकरीला असणाऱ्या लोकांना कामावर हजर राहण्याचा नोटीस आल्या आहेत त्यांची खात्री करून त्या लोकांची कोरोना चाचणी करून रिपोर्ट निगेटिव्ह आले तर त्यांना जाण्याची परवानगी द्या. मुंबईहून आलेल्या लोकांना रेशन धन्य देण्याची व्यवस्था करा.गावातील दूध संकलन कशा प्रकारे सुरू करून लोकांना दिलासा देता येईल याचा विचार करा अशा सूचना पालकमंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
        मणदूर येथील लोकांनी लॉक डाऊनची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, विराज नाईक,जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी, मुख्यकार्यकारीअधिकारी गुडिलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, जिल्हा शल्यचिकित्सक संजय साळुंखे, सभापती वैशाली माने,पंचायत समिती सदस्य बी. के. नायकवडी,मनीषा गुरव,  प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ.अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.मनजीत परब, डॉ.नंदकुमार गवारी, मणदूरचे सरपंच वसंत पाटील,उपसरपंच विजय चौगुले,ग्रामसेवक एम.एन.पाटील,तलाठी भास्कर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर

मांगले- सावर्डे बंधारा दुरुस्ती लवकरच-  जलसंपदामंत्री जयंत पाटील

मोलमजुरी करणाऱ्यांंचा मुलगा 

व -भाजीविक्रेत्या आज्जीचा नातू बनला पोलीस  उपाधिक्षक

----------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------

घागरेवाडीत जनावरांच्या शेडमध्ये घुसला बिबट्या

Post a Comment

0 Comments