शिराळे खुर्द गाव सील करून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे |
शिराळा, ता.२१: शिराळे खुर्द (ता. शिराळा) येथे मुंबईहुन आलेला ५३वर्षीय एक पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. मणदूर येथील पाच कोरोना मुक्त झाले आहेत. तालुक्यातील रुग्णाची संख्या ९७ झाली आहे. आज अखेर तालुक्यातील २० गावे कोरोना बाधित झाली आहेत.
सदर रुग्ण १६ जून रोजी मुंबईहुन दुचाकीवरून येऊन घरीच क्वारंटाईन झाली होती. ५० वर्षावरील व्यक्तींच्या स्वॅब तपासणीत त्यांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे .सागाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ डी. बी. निर्मळे , डॉ वीरेंद्र गायकवाड,पर्यवेक्षक शंकर पाटील,एच. एन.ठोंबरे, एस .एस.शिंदे, अविनाश फातले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी गावास भेट देऊन त्या ठिकाणी घरोघरी सर्व्हे व जनजागृती सुरू केली आहे.
तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी भेट देऊन पाहणी करून गावकऱ्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या. दरम्यान त्या व्यक्तीच्या संपर्कातील ११ लोकांचे संस्थत्मक विलगीकरण करण्यात आले आहे.गावातील उत्तर गल्ली कंटेंटमेन्ट झोन घोषित करण्यात आला आहे .शिराळा पोलिसांनी गावात बंदोबस्त ठेवला आहे
मणदूर येथील ५०,६५ वर्षीय पुरुष , १६,७६ , ९ ० वर्षीय महिला कोरोना मुक्त झाले आहेत
बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा-
एक नजर
एकूण ९ ७ रुग्ण तर ४६ कोरोना मुक्त
मणदूर येथील ५६ , रिळे येथे ६ , निगडी ५ , किनरेवडी येथे ४ मांगले व रेड येथे प्रत्येकी ३ , शिराळा , मोहरे , खेड , खिरवडे , सोनवडे - ( काळोखेवाडी ) , माळेवाडी येथे प्रत्येकी २ , तर अंत्री खुर्द , करुंगली , चिंचोली , पणुंब्रे तर्फ शिराळा , लादेवाडी , पुनवत , बिळाशी , शिराळे खुर्द येथे प्रत्येकी एक असे ९ ७ रुग्ण झाले असून ४६ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत . मोहरे व मणदूर येथील दोघांचा मृत्यू झाला आहे .
वाचा इतर महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर
मांगले- सावर्डे बंधारा दुरुस्ती लवकरच- जलसंपदामंत्री जयंत पाटील
मोलमजुरी करणाऱ्यांंचा मुलगा
व -भाजीविक्रेत्या आज्जीचा नातू बनला पोलीस उपाधिक्षक
----------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------
घागरेवाडीत जनावरांच्या शेडमध्ये घुसला बिबट्या
----------------------------------------------------------------------------------------
0 Comments