शिराळा कंटेनमेंट झोन व बफर झोन
शिराळा: येथे पती पत्नी कोरोना बाधित आढळून आल्याने ते रहात असलेला परिसर कंटेनमेंट झोन केला आहे.तर खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन करण्यात आला आहे.कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे –
शिराळा शहरातील तळीचा कोपरा (शिंदे गल्ली कॉर्नर)
1) पुर्व – सचिन शिंदे वाडा
2) पश्चिम – राशिवडेकर यांचे घरापर्यत
3) दक्षिण – राम पाटील यांचे घरापर्यत
4) उत्तर – खंडू शिंदे यांचे घरापर्यत व अंबामाता घरापर्यत
--------------------------------------------------------------------
बफर झोन (1000 मीटर) पुढीलप्रमाणे –
1) पुर्व – तोरणा ओढा
2) पश्चिम – बाबासो शिंदे यांचे शेड पर्यत
3) दक्षिण – शिराळा चांदोली रस्ता
4) उत्तर – शिंदे पेट्रोल पंपापर्यंत
या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
----------------------------------------------------------------------
आर्सेनिक अल्बम ३० गोळ्या व सॅनिटायझरचे वितरण
आरोग्य विभागाच्यावतीने कुटुंबा सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, नगरसेवक बंडा डांगे, नगरसेविका सीमा कदम यांनी या भागाची पाहणी केली. कोरोना रोगांपासून बचाव करण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांचे वतीने व नगरपंचायत यांचे सहकार्याने नगरसेवक बंडा डांगे, सीमा कदम यांनी या परिसरामध्ये तातडीने मोफत "आर्सेनिक अल्बम ३०" या होमिओपॅथिक गोळ्या व सॅनिटायझरचे वितरण केले. या परिसरातील नागरिकांना काही अडचणी असल्यास आमच्याशी थेट संपर्क करावा असे मुख्याधिकारी व नगरसेवक यांनी केले आहे.
यावेळी शिराळा नगरपंचायतचे मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, शिवाजी शिंदे, विनायक गायकवाड, हरिभाऊ कवठेकर, सम्राट शिंदे, प्रदीप कदम, प्रकाश शिंदे, रोहित कदम, नारायण शिंदे आदी उपस्थित होते.
0 Comments