BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी भरती करा; आशा स्वयंसेविकांना कोरोनाच्या सर्व्हेचे प्रतिदिन २०० रुपये मानधन द्या- सत्यजित देशमुख

उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी भरती करा; आशा स्वयंसेविकांना कोरोनाच्या सर्व्हेचे प्रतिदिन २०० रुपये मानधन द्या- सत्यजित देशमुख

शिराळा: तालुक्यामध्ये कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावर उपाय योजना प्रशासनाने कराव्यात यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांना देताना सत्यजित देशमुख,  संपतराव देशमुख, सम्राट शिंदे, अजय जाधव, प्रा. सम्राट शिंदे, अभिजित यादव
शिराळा,ता.६: शिराळा उपजिल्हा रुग्णालयांमध्ये अपुरे असणारे डॉक्टर व इतर कर्मचारी भरण्यात यावे. कोरोनचा सर्व्हे करणाऱ्या आशा स्वयंसेविका याना दोनशे रुपये प्रतिदिनी मानधन देण्यात यावे.  अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी  यांना भारतीय जनता पार्टीच्यावतीने सत्यजित देशमुख यांनी दिले.
 निवेदनात म्हटले आहे, सांगली जिल्ह्यामध्ये हे सद्यस्थितीला सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण शिराळा तालुक्यामध्ये आहेत. प्रशासनाने त्या अनुषंगाने तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय व कोकरूड येथील ग्रामीण रुग्णालय सह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना सोयीसुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. उपजिल्हा रुग्णालय शिराळा येथे आकृतीबंधा नुसार ५० बेड ची मान्यता आहे. परंतु सद्यस्थितीला डॉक्टर व कर्मचारी अपुरे असल्याने मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. कोकरूड येथे आवश्यक असणारी औषधे व इतर यंत्रसामुग्री लवकरात लवकर उपलब्ध करून रुग्णांची व  लोकांची सोय करावी. शिराळा तालुक्यामध्ये मुंबईहून येणाऱ्या लोकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे त्यामुळे मुंबई वरून येणाऱ्या लोकांचा   स्वँब घेऊनच प्रवेश देण्यात यावा जेणेकरून रोगाचा संसर्ग वाढणार नाही.
        जिल्हा परिषद प्रशासन व जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तरीत्या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथिक औषधाचा पुरवठा तालुक्यामध्ये घरोघरी लोकांना करण्यात यावा जेणेकरून लोकांची रोगप्रतिकारशक्‍ती वाढण्यास मदत होईल. या साथीच्या रोगांमध्ये सर्वाधिक काम आशा स्वयंसेविका यांनी केलेले परंतु शासन त्यांना निव्वळ ३५ रुपये मानधन देऊन राबवून घेत आहे  त्यांच्या कामाचा विचार करून शासनाने आशा स्वयंसेविका यांना  दोनशे रुपये प्रतिदिनी मानधन देण्यात यावे.  वाळवा व शिराळा तालुक्यातील अनेक लोक कोल्हापूर, सातारा या  जिल्ह्यांमध्ये कामाला आहेत लॉकडॉन ची परिस्थिती असल्याने व जिल्हा बंदी असल्याने अशा लोकांना इतर जिल्ह्यामध्ये कामावरती जाता येत नाही.  शेतकऱ्यांना देखील इतर जिल्हयात शेतीमध्ये जाता येत नाही .अशा लोकांना तात्काळ प्रशासनाने पास उपलब्ध करून द्यावेत.
     यावेळी जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख,  सम्राट शिंदे,  अजय जाधव, प्रा. सम्राट शिंदे, जगदीश कदम,  अविनाश खोत, अभिजीत यादव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments