BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मणदूर येथील जनावरांना विराज पशुखाद्याची मोफत शंभर पोती


ब्रेकिंग न्यूज- 

शिराळा तालुक्यातील किनरेवाडी येथे पती पत्नी दोघांना कोरोनाची लागण.

सविस्तर बातमी थोड्या वेळात

---------------------------------------------------------------------------------------

मणदूर येथील जनावरांना विराज पशुखाद्याची मोफत शंभर पोती 

शिराळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील मणदूर येथे सातत्याने कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे गाव पूर्णपणे बंद असून त्यामध्ये मुक्या दुभत्या जनावरांचे हाल होऊ नयेत म्हणून विराज पशुखाद्याची मोफत शंभर पोती देण्यात आली आहेत, अशी माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.
             ते म्हणाले, शिराळा तालुक्यातील मणदूर येथे सातत्याने कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या स्तरावरून उपाय योजना सुरू आहेत. संपूर्ण गाव बंद आहे. या घडामोडीत दुभत्या जनावरांचे चाऱ्या विना हाल होत आहेत. ही बाब लक्षात आल्यावर आज विराज इंडस्ट्रीज मधील पशुखाद्य प्रकल्पातून १०० पोती विराज पशुखाद्य मणदूर गावातील शेतकऱ्यांच्या जनावरांना मोफत दिले. पशुखाद्याने भरलेला ट्रक तहसीलदार कार्यालयाकडे आज रवाना करण्यात आला. त्याचे वाटप तहसील कार्यालयामार्फत करण्यात येईल.
        आमदार नाईक म्हणाले, कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व पातळीवर लढाई चालू आहे. २६ जून रोजच्या माझ्या वाढदिवसावर होणारा सर्व प्रकारचा खर्च टाळून कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी मतदार संघात घरोघरी आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी गोळ्या वाटण्यात येत आहेत.
             या शिवाय मतदारसंघातील नगरपंचायत व ग्रामपंचायतींना उत्पादन दरात विराज सॅनिटीझरचे वाटप केले आहे. कोरोन्टाईन केलेल्या लोकांच्या सोयीसाठी चादरी व बेडशीट दिल्या आहेत. याशिवाय फेस शिल्ड, मास्क आदींचे वाटप केले आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने मतदार संघातील लोकांच्या आरोग्य चांगले राहावे म्हणून शक्य त्या उपाय योजना केल्या आहेत. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी सर्व बाजूंनी प्रयत्न करावेत. सूचनांचे पालन करावे व सुरक्षित राहावे.

Post a Comment

0 Comments