BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर शिराळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू


आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर शिराळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

शिराळा, ता.११: शिराळा तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्यावर शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येणार असल्याने उपजिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालय झाले आहे.. आज सहा रूग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. वैद्यकीय कर्मचारी कमी असल्याने सर्वांना १२ तास ड्युटी करावी लागणार आहे.
           या शिराळा तालुक्यातील पश्चिम भागातील बहुतांशी लोक हे मुंबईत आहेत.मुंबईत कोरोनचा फैलाव वाढू लागल्याने अनेकांनी गावची वाट धरली. त्या माध्यमातून तालुक्यता कोरोनचा संसर्ग वाढू लागला आहे. घरीच क्वारंटाईन झालेल्या लोकांनी आपण क्वारंटाईन आहे हे गांभीर्याने घेतले नसल्याने हा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. सध्या तालुक्याता एकूण कोरोना बाधित रुग्णाची संख्या ५७ झाली आहे.  सर्वाधिक रुग्ण मणदूर येथे आहेत.
         ग्रामीण रुग्णालयाचा कारभार उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीत  सुरू होता. मात्र ते कोविड रुग्णालय केल्याने ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमध्ये नॉन कोविड रुग्णांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत.
            मणदूर येथील चार, रिळे,१ व लादेवाडी १  आशा एकूण सहा रुग्णावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.सहा जून रोजी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी ग्रामीण रूग्णालय कोकरूड व उपजिल्हा रूग्णालय शिराळा येथील कोविड केअर सेंटरची पहाणी करून तेथे करण्यात आलेल्या तयारीचा व सोयी सुविधांचा  आढावा घेतला. होता.
         या ठिकाणी सौम्य लक्षणे असणाऱ्या कोविड १९ रुग्णांना ठेवण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय शिराळा आणि ग्रामीण रुग्णालय कोकरूड येथे तयारी करावी आशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज पासून कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.



Post a Comment

0 Comments