BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा तालुक्यातील ९ कोरोना पॉझिटिव्ह



शिराळा तालुक्यातील ९ कोरोना पॉझिटिव्ह


शिराळा, ता.१३: शिराळा तालुक्यातील मणदूर ५,माळेवाडी १, खेड १ पणुंब्रे तर्फ शिराळा १,पुनवत १ आशा ९जणांनचा  कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शिराळा पश्चिम भागाचे अर्धशतक पूर्ण झाले आहे.
मणदूर येथील रुग्णांची संख्या ३६ झाली आहे. शिराळा तालुक्यातील रुग्णाची संख्या ६८ तर पश्चिम भागातील रुग्णांची संख्या ५३ झाली आहे. माळेवाडी येथील ६० वर्षीय वृद्ध २ जून रोजी आपल्या कुटुंबा समवेत मुंवाईहून आले होते.घरीच क्वारंटाईन झाले होते. ५० वर्षा पुढील लोकांचे स्वॅब घेणे जात असल्याने त्या वृद्धीचा ही स्वॅब घेतला होता. त्यांना कोणताही त्रास जाणवत नाही पण त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील चार लोकांना शिराळा येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे.
मणदूर येथील रुग्ण कोरोना बधितांच्या संपर्कातील असून खेड येथील ४४ वर्षीय युवक आपल्या कुटुंबातील तीन जणांच्यासह  ६ जून रोजीमुंबईहून आलेले आहेत. ते घरीच क्वारंटाईन होते.  त्यास ११जूनला त्रास जाणवू लागल्याने मिरज येथे नेले. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कातील तिघांना शिराळा येथे क्वारंटाईन केले आहे.पणुंब्रे तर्फ शिराळा  येथील  ३५ वर्षीय युवक  हा  मुंबईहून सासुरवाडीत ४ जूनला आला .तो मूळचा कराड तालुक्यातील दुशिरे गावचा आहे. मुंवईहून आल्याने त्याचा १० तारखेला त्याचा स्वॅब घेतला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यास कोणताही त्रास जाणवत नाही. तो पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील सहा जणांना शिराळा येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे.
पुनवत येथे मुंबईहून लेकीकडे आलेल्या ८५ वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाली आहे. ती मूळची कणदूर येथील आहे. चार दिवसांपूर्वी तिला त्रास जाणवू लागल्याने तिच्या घशाचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला होता.
तालुक्यात निगडी ४ , रेड ३ , अंत्री खुर्द १ , मोहरे २ , खिरवडे २, करुंगली १ , चिंचोली १ , मणदूर ३६ काळोखेवाडी २, रिळे ६,माळेवाडी२,मांगले ३ ,किनरेवाडी १, लादेवाडी १,खेड १,पणुंब्रे तर्फ शिराळा १,पुनवत १ असे  एकूण ६८ रुग्ण झाले आहेत.
 निगडी ३,रेड३,चिंचोली १,करुंगली १, मोहरे १,मणदूर ४, खिरवडे २,रिळे १ असे १६ कोरोना मुक्त झाले आहेत.
तालुक्यातील एकूण रुग्ण ६८
कोरोना मुक्त १६
कोरोनामुळे मृत २

Post a Comment

0 Comments