BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

माय लेकींना कोरोनाची लागण

माय लेकींना कोरोनाची लागण



शिराळा,ता.४: सोनवडे पैकी काळोखेवाडी( ता.शिराळा) येथील  ४० वर्षीय  महिलेचा  व मणदूर येथील ७५ वर्षीय वृद्धेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.
      ह्या महिला मणदूर येथील कोरोना बाधित८१ वर्षाच्या वृद्धाची मुलगी व पत्नी असून त्या त्यांच्या संपर्कात आल्या होत्या. या कुटुंबातील कोरोना बधितांची संख्या सात झाली आहे.
        त्या वृद्धाच्या कुटुंबातील पुतण्यासह ६ लोकांना शिराळा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहात संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. त्या मधील. ४५ वर्षीय पुरुष, ३८ वर्षीय महिला, २१ वर्षीय युवक, १८वर्षीय युवक हे १ जून रोजी पॉझिटिव्ह आले आहेत. आज कोरोनाबाधित आलेल्या महिला त्या वृद्धीची पत्नी व  मुलगी आहे.ती त्यांच्या संपर्कात आली होती. त्यामुळे त्या वृद्धाच्या कुटुंबातील एकूण ७जण बाधित झाले आहेत.
शिराळा पश्चिम भागात मोहरे येथे पहिला रुग्ण सापडला होता.त्यानंतर खिरवडे, करुंगली,चिंचोली,मणदूर,रिळे व आता काळोखेवाडी येथे रुग्ण सापडला आहे. आज मोहरे व करुंगली येथील दोन रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर दोन रुग्णाची भर पडली आहे.

Post a Comment

0 Comments