BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सांगली जिल्ह्यात आज ९ जण कोरोणाबाधित -जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी


सांगली जिल्ह्यात आज  ९ जण कोरोणाबाधित -जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी 

सांगली दि. 1(जि.मा.का) सांगली जिल्ह्यात आज  सायंकाळी८वाजेपर्यंत 9 जण कोरोणाबाधित झाले असून उपचारा खालील रुग्णांची संख्या 52 झाली आहे . तर दोन रुग्ण कोरोणा मुक्त झाले आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ .अभिजित चौधरी यांनी दिली
        आज नवीन नऊ रुग्ण कोरोणा बाधित झाले असून यामध्ये मणदुर तालुका शिराळा येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरातील चार व्यक्ती (४५ वर्षाचा पुरुष , ३८ वर्षांची महिला, २१ वर्षाचा मुलगा, १८ वर्षाचा मुलगा)
 नेर्ली तालुका कडेगाव येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरातील दोन व्यक्ती रुग्णाची पत्नी वय 51 , मुलगी वय 25 तालुका शिराळा येथील 48 वर्षाचा पुरुष, शेटफळ तालुका आटपाडी येथील ३९ वर्षाचा पुरुष,
औंढी तालुका जत येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या पुतण्या वय वर्ष 30 यांचा समावेश आहे. रिळे तालुका शिराळा व शेटफळे तालुका आटपाडी या दोन ठिकाणी आज नवीन कंटेनमेंट झोन सुरू करण्यात येत आहेत. तर अन्य ठिकाणी यापूर्वीच कंटेनमेंट सुरू झालेले आहेत .
        ज्या चार रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे यामध्ये औंढी तालुका जत येथील ५५ वर्षाचा पुरुष सद्यस्थितीत इन्व्हेंजीव व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आला आहे. अजूनही स्थिती चिंताजनकच आहे.

 कडेबिसरी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथील 48 वर्षाचा पुरुष ऑक्सिजन'वर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे.खिरवडे तालुका शिराळा येथील 56 वर्षाचा पुरुष रुग्णावर सद्यस्थितीत नॉन-इनव्हेंजीव व्हेंटिलेटरवर उपचार अजूनही सुरू असून प्रकृती स्थिर आहे.
 मणदुर तालुका शिराळा येथील 81 वर्षाचा पुरुष नॉन-इनव्हेंजीव व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेला असून प्रकृती स्थिर आहे.
 तर सोहली तालुका कडेगाव येथील 54 वर्षे पुरुष व आटपाडी येथील 57 वर्षाचा पुरुष आज कोरोना मुक्त झाला आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

एक नजर

आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण - ९

उपचारा खालील रुग्ण - ५२

आज अखेर बरे झालेले रुग्ण-  ६५ 

आज अखेर मृत झालेले रुग्ण-  ४

 आजतागायत एकूण पॉझिटिव्ह रुग्ण-. १२१

 पॉझिटिव्ह पैकी चिंताजनक रुग्ण - ४

आज कोरोना मुक्त झालेले रुग्ण - २

आजचे/आज अखेरचे ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्ण -.  ९/८२

आजचे /आज अखेरचे शहरी भागातील पॉझिटिव्ह रुग्ण- ०/२८

आजचे /आज अखेर चे मनपा क्षेत्रातील पॉझिटिव्ह रुग्ण- ०/११

Post a Comment

0 Comments