BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

येथे शिट्टी वाजली की बंद होतात दरवाजे


मणदूर:येथे कोरोनाचे रुग्ण वाढल्याने स्वयंसेवक पावसाळ्यात ही छोट्या हात गाड्यावरून घरोघरी लोकांना रेशननिगचे धान्य पोहच करत आहेत.

येथे शिट्टी वाजली की बंद होतात दरवाजे

मणदूर (ता.शिराळा) येथे कोरोनाची संख्या वाढू लागल्याने गावच्या सुरक्षिततेसाठी २२ स्वयंसेवक प्रत्येकाच्या मदतीसाठी झटत आहे. सध्या पावसाळा सुरू झाल्याने आम्ही किती ही कष्ट घेतो पण कोरोनाची साखळी तुटुंदे अशी प्रार्थना सर्वजण करत आहेत. ही साखळी तोडण्यासाठी दुपारी १२वाजता स्वयंसेवक शेट्टी वाजून दरवाजे बंद करण्याच्या सूचना देत आहेत.
मणदूर येथे सध्या रुग्णांची संख्या ५० झाली आहे.गावात दिवसेंदिवस रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे गाव बंदी करण्यात आली आहे. गावातील लोकांना बाहेर पडता येत नाही.त्यांना लागणाऱ्या अत्यावश्यक सेवेसाठी गावातल्या २२ तरुणांची स्वयंसेवक म्हणून नेमणूक केली आहे. त्यांच्या माध्यमातून लोकांना औषध, किराणा, भाजीपाला घरपोच दिला जात आहे. घरोघरी सॅनिटाइझर दिले जात आहे. प्रत्येकाच्या गरजेनुसार त्यांच्या खात्यावरील बँकेतून पैसे काढून घरी पोहच केले जात आहे. सध्या रेशनचे धान्य वाटप घरोघरी स्वयंसेवक करत आहेत. काही कोरोना बाधित कुटुंब उपचारासाठी गेले असल्याने त्यांच्या जनावरांची देखभाल हे स्वयंसेवक करत आहेत. सध्या पावसाचा जोर वाढला असल्याने या पावसात सुध्दा आपल्या घराबरोबर गावच्या लोकांना मदत करण्यासाठी हे स्वयंसेवक सदैव तत्पर आहेत. गावातील कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी लोकांनी बाहेर पडूनये असे आवाहन करण्यात आले आहे.त्यानुसार गेले दोन दिवस सकाळी १२ ते सायंकाळी ५ पर्यंत लोक घरचे दरवाजे बंद करून घरीच बसत आहे. ही साखळी खंडित करण्यासाठी आम्ही हवे ते घरी देतो पण तुम्ही घरी रहा असे आवाहन स्वयंसेवक करत आहेत.

Post a Comment

0 Comments