BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

किनारेवाडी येथील युवकास कोरोनाची लागण

किनारेवाडी येथील युवकास कोरोनाची लागण

शिराळा, ता.९:किनरेवाडी( ता.शिराळा) येथील मुंबईहून आलेल्या ३५ वर्षीय युवकास कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे शिराळा तालुक्यातील रुग्णाची संख्या ४४ तर पश्चिम भागातील रुग्णांची संख्या ३४ झाली आहे.
         सदर युवक मुंबईहून ६जून रोजी  आपल्या पत्नीसह आला होता. तो जिल्हापरिषद शाळेत क्वारंटाईन झाला होता. त्यास त्रास जाणवू लागल्याने ७ जून रोजी मिरज येथे नेण्यात आले होते.त्याचा आज अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पणुंब्रे वरूण परिसरात एकच खळबळ उडाली आहे .तालुक्याच्या पश्चिम विभागात दिवसेंदिवस कोरणा रुग्णांची संख्या वाढत असल्याने लोकांच्या चिंतेचे वातावरण पसरले आहे.
         किनरेवाडी येथे गटविकास अधिकारी डॉ.अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील,मंडल अधिकारी पी.पी.जाधव  यांनी भेट देऊन योग्य त्या सूचना दिल्या आहेत. सरपंच राकेश सुतार,उपसरपंच परशु पाटील, माजी सरपंच सदाशिव पवार, ग्रामसेवक एस.डी.जगताप, तलाठी एम.बी.सातपुते, यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी यांनी गावातील रस्ते बंद केले आहेत.

Post a Comment

0 Comments