BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा येथे रक्तदान शिबीर आयोजन


शिराळा येथे रक्तदान शिबीर आयोजन

शिराळा, ता.९:विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य, श्रमिक मुक्तीदल (लोकशाहीवादी )आणि सर्व पुरोगामी संघटना आणि संघटीत असंघटीत अंगमेहनती श्रमिक मजूर, कामगार बांधवांच्या सहकार्याने शिराळा येथे उद्या बुधवारी सकळी दहा वाजता रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
          हे शिबीर संत गाडगेबाबा स्मृतीभवन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, पोष्ट ऑफीसच्या मागे  येथे घेण्यात आले आहे. या शिबिराचे उदघाटन प्रा.डॉ. विजयालक्ष्मी  नियोगी यांच्या हस्ते व  कॉ. धनाजी गुरव, प्रा. विजयकुमार जोखे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे
          या शिबिरास जास्ती जास्त रक्तदात्यानी उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रक्तदान शिबीरात सोशल डिस्टंसींगचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे.  त्या ठिकाणी मास्क, हँड ग्लोज आणि सॅनिटाइजरचा वापर केला जाणार आहे.
         हे शिबीर यशस्वी करण्यासाठी मारूती रोकडे, कॉ.दिपक कोठावळे,प्रा. डॉ. मिलिंद साळवे,सेवा निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी, हंबीरराव देशमुख,कॉ. दिग्विजय पाटील,डॉ. सुनिल पाटील,अमोल काटकर, अमोल साठे, बाबुराव केसरकर,संदीप कांबळे,काशिनाथ वगरे,मारुती मस्के    प्रयत्नशील आहेत. या शिबिराचे संयोजक शिराळा तालुका कामगार परिषद व ज्ञानदर्शन एज्युकेशनल वार्ता यांच्यावतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments