शिराळा तालुक्यातील करुंगली येथील युवकास कोरोनाची लागण
शिराळा, ता.२७:करुंगली (ता.शिराळा) येथील मुंबईहून आलेल्या ३३वर्षीय युवकास कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.मोहरे खिरवडे पाठोपाठ करुंगली येथे कोरोनाची लागण झाल्याने शिराळा पश्चिम भागात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
सदर व्यक्ती मुंबईहून येऊन घरी क्वारंटाईन झाली होती. त्यास त्रास जाणवू होऊ लागल्याने सोमवारी मिरज येथे पाठवण्यात आले होते.त्या ठिकाणी कोरोनाची चाचणी घेण्यात आली होती.आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कात असलेल्या कुटुंबातील १३ जणांना शिराळा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृह संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.
या गावाची लोकसंख्या ११४८ असून ३३४ कुटुंब आहेत.त्या ठिकाणी ६पथकांच्या माध्यमातून १२ कर्मचारी घरोघरी सर्व्हे सुरू आहे. गावात औषध फवारणी केली जात आहे. गावातील प्रमुख रस्ते बंद करण्यात आले आहेत.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांच्या सूचनेनुसार चरण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एम. जमादार, डॉ.शाहीद कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहायक एस.वाय. धुमाळ,नजीर मुल्ला, आशा गट प्रवर्तक मनीषा पाटील व त्यांचे सहकारीघरोघरी जाऊन जनजागृती व सर्व्हे करत आहेत.
0 Comments