BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पक्षाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागावर शिराळ्यात उपचार

शिराळा:अज्ञात पक्षाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागावर उपचार करताना तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल गावडे, सोबत प्लॅनेट अर्थ फाऊंडेशनचे सदस्य प्रणव महाजन, सुशिलकुमार गायकवाड, दिग्विजय गायकवाड, राज पाटील, स्वयंसेवक 

 पक्षाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागावर शिराळ्यात उपचार


शिराळा,ता.२९: येथील सुजननगर परिसरामध्ये अज्ञात पक्षाच्या हल्ल्यामध्ये नाग जखमी अवस्थेत सापडलेल्या नागवर प्लॅनेट अर्थ फाऊंडेशनच्या वन्यजीव आपत्कालीन सेवे मार्फत उपचार सुरू आहेत.
                    याबाबत परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ वन्यजीव आपत्कालीन सेवाला संपर्क करून या घटनेची माहिती दिली. त्यावेळी संस्थेचे सदस्य प्रा. सुशील कुमार गायकवाड यांनी त्या नागास ताब्यात घेऊन वन खात्यामध्ये माहिती दिली. त्यानंतर  तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली  उपचार केले. नाग जास्त प्रमाणात जखमी असल्यामुळे त्याला ठीक होईल पर्यंत डॉक्टरांच्या देखरेखीखाली  ठेवण्यात आले आहे. तज्ञांच्या अभ्यासानुसार हा नाग साधारण एक वर्ष वयाचा आहे. तो जगण्याची चांगली शक्यता असल्यामुळे पुढील काही दिवस त्याच्यावर उपचार करण्यात येणार आहेत.  यावेळी उपचार करताना प्लॅनेट अर्थ फाऊंडेशनचे सदस्य प्रणव महाजन, सुशिलकुमार गायकवाड, दिग्विजय गायकवाड, राज पाटील, स्वयंसेवक उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments