BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चेक पोस्टवर सापडलेले अ़डीच तोळ्याचे मंगळसुत्र पोलिस हावलदार सचिन मोरे यांनी केले परत


चेक पोस्टवर सापडलेले अ़डीच तोळ्याचे मंगळसुत्र पोलिस हवालदार सचिन मोरे यांनी केले परत

                     
       शिराळा, ता.२९: मांगले (ता.शिराळा) येथील सुहास रामचंद्र रोकडे यांच्या पत्नीचे अडीच तोळ्यांचे सापडलेले मंगळसूत्र पोलीस हवालदार सचिन मोरे यांनी प्रामाणिकपणे परत केले.त्यांच्या या प्रामाणिकपणा बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
समाज्यात प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. पोलीस यंत्रणे बद्दल लोक चांगले बोलत नाहीत ही वस्तुस्थिती असली तरी सर्वच पोलीस तसे नसतात हे अनेक वेळा जाणवले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी लोकांना अन्न, जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप अशी केलेली मदत आपण पाहिली आहे. त्यात रस्त्यावर सापडलेले अडीच तोळ्याचे मंगळसूत्र परत करून सचिन मोरे या पोलिसांनी आपल्या प्रामाणिकपणा सिद्ध करून पोलिसांच्या चांगुलपणाचे दर्शन घडवले आहे.
            याबाबत समजलेली माहिती अशी, सांगली व  कोल्हापूर  जिल्हा हद्दीवर चिकुर्डे  (ता.वाळवा) पुलावर  कुरळप पोलीस ठाण्याचे चेक पोस्ट आहे. २८ मे रोजी या चेक पोस्टवर कुरळप पोलीस ठाण्याचे हवालदार सचिन मोरे ड्युटी बजावत होते. यावेळी अनेक प्रवाशी ये जा  करत होते. याच वेळी  चिकुर्डे चेक पोस्टवर मांगले येथील सुहास रामचंद्र  रोकडे व त्यांच्या पत्नी  सुजाता  रोकडे या दवाखान्यासाठी कोल्हापूर ला गेले होते. सायंकाळी पुन्हा मांगले येथे येत असताना सुहास रोकडे चेक पोस्टवर त्यांच्या खिशातून आधारकार्ड काढत असताना अडीच तोळ्यांचे  मंगळसूत्र पडल्याचे त्यांना कळले नाही. आधारकार्ड दाखवून ते घरी आले.घरी आल्या नंतर खिशात मंगळसूत्र नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी चेक पोस्टवर आलेल्या शिक्षक मित्र वैभव तोडकर यांना या बाबत माहिती दिली. त्यांनी त्यांच्या सखाराम पाटील या शिक्षक सहकाऱ्यांकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांनी हवालदार सचिन मोरे यांना ते सापडले असल्याचे सांगितले.त्यानंतर रोकडे दाम्पत्यांच्या ताब्यात ते मंगळसूत्र देण्यात आले.त्यांच्या या प्रामाणिकपणामुळे रोकडे कुटुंब गहिवरले.मोरे यांच्यातली प्रामणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


मी चेक पोस्टवर असताना मला एक महिला खाली वाकलेली दिसली.मी त्यांना विचारणा केली असता त्यांनी मंगळसूत्र माझ्याकडे दिले.त्यानंतर आम्ही काही लोकांकडे कोणाची वस्तू हरवली आहे का याबाबत चौकशी केली पण त्यांनी नाही म्हणून सांगितले. त्यानंतर मी आमच्या पोलीस ग्रुपवर माहिती दिली. सहायक पोलिस निरीक्षक अरविंद काटे साहेब यांना या बाबत कल्पना दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी  रोकडे यांची चेकपोस्टवर झालेली एन्ट्री व मंगळसूत्र सापडलेली वेळ आणि मंगळसूत्रा बाबतची इतर माहिती याची खात्री करून त्यांना मंगळसुत्र परत केले.
सचिन मोरे (पोलीस हवालदार कुरळप पोलीस ठाणे)

Post a Comment

0 Comments