BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

त्रासाला कंटाळून बापानेच केला एकुलत्या एक मुलाचा खून


त्रासाला कंटाळून बापानेच केला एकुलत्या एक मुलाचा खून

शिराळा, ता.२६: दारू पिउन घरी त्रास देत असल्याच्या कारणावरून गजानन भगवान डांगे (वय ३२ )याचा वडील भगवान जगन्नाथ डांगे (वय ६० )यांनी दगड डोक्यात घालून खून केला. संशयित आरोपी भगवान हा स्वतः पोलिसात हजर झाला. एकुलत्या एक मुलाचा असा बापानेच खून केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. संशयित आरोपी भगवान यास पोलिसांनी अटक केली आहे
            ही घटना आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत मयत गजाननची पत्नी दुर्गा डांगे हिने शिराळा पोलिसात वर्दी दिली आहे. याबाबत पोलिसातून समजलेली माहिती अशी, गजानन हा गेले अनेक दिवस काम धंदा करत नव्हता. त्यास दारूचे व्यसन होते.तो नेहमी दारू पिऊन आई वडील व पत्नीस शिवीगाळ करून मारहाण करत असे. सोमवारी त्याने पत्नीस मारहाण करून शिंगटेवाडी येथे माहेरी पाठवले होते.
          आज मंगळवारी सकाळ पासून तो दारूच्या नशेत होता. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तो दारू पिऊन घरी गेला. आई वडिलांना शिवीगाळ केली. त्यावेळी रोजच्या त्रासाला वैतागून रागाच्या भरात भगवान याने दगड डोक्यता घालून गजाननचा याचा खून केला. भगवान स्वतः पोलिसात हजर झाला. खून करून पोलीस ठाण्यात येत असताना वाटेत त्याचा कायमचा काटा काढला असे बडबडत होता. शिराळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. गजानन याच्या पश्चात वडील,आई,पत्नी,दोन मुली असा परिवार आहे. घटना गावातच घरी घडल्याने घटनास्थळी लोकांनी गर्दी केली होती.
पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे करता आहेत.
 डांगे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंग
गजानन हा एकुलता एक मुलगा.त्यास दोन मुले आहेत.त्याचा खून झाल्याने व वडील संशयित खुनी असल्याने घरची जबाबदारी गजाननची पत्नी व आई यांच्यावर पडली आहे. त्यामुळे त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
 एक महिण्यात तिसरा खून
शिरशी,कांदे आणि आज शिराळा येथे असे एक महिण्यात तालुक्यता हा तिसरा खून आहे. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments